कथाकार राजेंद्र गहाळ यांच्या कथेत रंगले चिमुकले
परभणी – येथील शारदा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर मौजे मांडवा येथे आयोजित करण्यात आले त्या प्रसंगी शाळा संपर्क व वाचन संकल्प महाराष्ट्राचा कार्यक्रमाअंतर्गत कथाकार राजेंद्र गहाळ यांचा कथाकथनाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सुनील बल्लाळ तर प्रमुख अतिथी म्हणून कथाकार राजेंद्र गहाळ, डॉ. गुरूदास लोकरे, डॉ. हेमंत शिंदे, सुरेश जयपुरकर, डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण , डॉ.अविनाश पांचाळ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्र संयोजक डॉ. नवनाथ सिंगापुरे, ज्ञानेश्वर चव्हाण यांची उपस्थिती होती.
यावेळी कथाकार राजेंद्र गहाळ यांनी रांजनातील पाय ही विनोदी कथा सादर केली, या कथेला चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी कथा कथनाला सुरुवात करण्यापूर्वी राजेंद्र गहाळ यांनी विद्यार्थ्यांना काही सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले, यामध्ये समाधान सत्यनारायण नवघरे याचा पहिला नंबर आला. यावेळी गहाळ यांनी विद्यार्थ्याला रोख बक्षीस दिले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला जि. प्रा शा. मांडवा येथील मुख्याध्यापक संतोष शिंदे, शिवाजी पालवे, सहशिक्षिका सुरेखा जाधव, छाया लहाने, पूनम पवार व शाळेचे सर्व विद्यार्थी, रासेयो स्वंयसेवक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुकाराम पवार, भगवान रिठाड,राजाराम मुत्रटकर, शेख जावेद, दत्ता अंबिलगे राजू कांबळे, मधू चव्हाण यांनी प्रयत्न केले.