शांताबाई नखाते विद्यालय पाथरी येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचे उद्घाटन संपन्न

0 53

पाथरी / प्रतिनिधी – विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच अध्ययन, अध्यापन व प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे, राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय एकात्मता याबरोबरच पर्यावरण संरक्षण, व या अनुषंगाने शाळेतील शिक्षक विद्यार्थी यांचे उत्तरदायित्व हे अत्यंत महत्त्वाचे असते त्यामुळेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना प्रोत्साहन देणारे ठरेल असे मत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिलभाऊ नखाते यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

 

 

मंगळवार दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी शांताबाई नखाते विद्यालय पाथरी ता. पाथरी जि. परभणी येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी गटसाधन केंद्र पाथरीचे केंद्रप्रमुख मुंडे ए.पी. विषय शिक्षक गिरी डी. यु. मुख्याध्यापक यादव एन.ई. प्राचार्य डहाळे के. एन. आदी उपस्थित होते. शालेय परिसरामध्ये मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान शैक्षणिक क्षेत्रात चैतन्य निर्माण करणारे असून विद्यार्थी व्यक्तीमत्त्वासाठी अत्यंत उपयोगाचे ठरणार आहे असे केंद्रप्रमुख मुंडे ए. पी. यांनी प्रतिपादन केले तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवन निरामय ठेवण्यासाठी नियमितपणे व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे असे विषय शिक्षक गिरी डी.यु .यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक यादव एन.ई. यांनी केले. सूत्रसंचालन प्राचार्य किशन डहाळे यांनी तर आभार प्रदर्शन अरविंद गजमल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्य केले.

 

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे स्पर्धात्मक अभियान दिनांक 5 डिसेंबर 2023 पासून संपूर्ण महाराष्ट्रातील शाळेमध्ये राबविण्यात येत आहे. या अभियानाचा 45 दिवसाचा कालावधी असून त्यानंतर सहभागी शाळांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे, रोख स्वरूपात पारितोषकांचे प्रयोजन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!