श्री शिवाजी महाविद्यालयाच्या रासेयो वार्षिक शिबीराचे उदघाटन
परभणी,दि 03 ः आज शैक्षणिक, सामाजिक तसेच भौतिकदृष्ट्या आपला समाज पुढारला असला तरी समाजात हुंडा ,बालविवाह सारख्या कुप्रथा अस्तित्वात आहेत. समाज उन्नतीसाठी या कुप्रथांचे उच्चाटन करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर महत्वाचे योगदान देत असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके यांनी शुक्रवार (०३) रोजी केले.
तट्टूजवळा येथे श्री शिवाजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष वार्षिक शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशेट्टी होते. यावेळी मंचावर सरपंच नारायणराव कदम, उपप्राचार्य प्रा.नारायण राऊत, कार्यक्रमाधिकारी डॉ.तुकाराम फिसफिसे, ग्रामसेविका ए.एल.काकडे, रुग्णसेवक माऊली वाघमारे, मुख्याध्यापक रामभाऊ शिंदे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम कदम, किसनराव कदम, ग्रा. सदस्य माउली कदम, न॑दुरामजी कदम, सदाशिवराव कदम, विश्वनाथराव कदम आदी उपस्थित होते. माझा युवा भारतासाठी हे ब्रीद घेऊन या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पुढे बोलताना श्री तिडके म्हणाले,युवक हे देशाचे भविष्य आहे त्यामुळे त्यांनी निश्चित ध्येय ठरवून ते साध्य करावे. व्यसनापासून दूर राहून सामाजिक माध्यमाचा मर्यादित वापर करून आपले जीवन घडवावे असेही ते म्हणाले.अध्यक्षीय समारोपात डॉ. श्रीनिवास केशट्टी म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विविध समस्यांची जाणीव होऊन त्या समस्याचे निराकरण करण्यासाठी मदत करावी. विद्यार्थ्यांनी सात दिवस शिबीरामधून विविध उपक्रमात सक्रिय भाग घेऊन आपला व्यक्तिमत्त्व विकास केला पाहिजे असेही प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.विजय परसोडे यांनी, सुत्रसंचलन डॉ.तुकाराम फिसफिसे यांनी तर आभार प्रा.विलास कु-हाडकर यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी प्रा.सविता कोकाटे,डाॅ.दिगंबर रोडे, प्रा.शरद कदम, डाॅ.सुरे॑द्र येनोरकर, प्रा.राजेसाहेब रे॑गे, प्रा.माया रोडगे, अरुण कदम, सय्यद सादिक, अच्युत तरफडे, दासु मस्के आदींनी पुढाकार घेतला.