श्री शिवाजी महाविद्यालयात भारतीय सैन्य दिन उत्साहात साजरा

1 23

परभणी,दि 17 ः
येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील एनसीसी विभागाच्या वतीने गुरुवार (ता.१६) रोजी भारतीय सैन्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.रोहिदास नितोंडे, एनसीसी प्रमुख मेजर डॉ.प्रशांत सराफ, प्रबंधक विजय मोरे, लांस नायक शेख नईम उपस्थित होते. यावेळी एनसीसीचे माजी विद्यार्थी तसेच सध्या भारतीय सैन्यात कार्यरत असलेले शेख नईम यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी
मान्यवरांच्या हस्ते ‘महिलांचे भारतीय सैन्यात योगदान ‘ या भित्तीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. शेख नईम यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाले, भारतीय सैन्य राष्ट्रीय सुरक्षेसोबतच आंतरराष्ट्रीय सुरक्षा, शांततेसाठी योगदान देते असे नमूद केले. याप्रसंगी त्यांनी दक्षिण आफ्रिका खंडातील कांगो या देशातील त्यांच्या सैन्य तुकडीची सहा महिने दिलेली शांतता सैन्य सेवा या संदर्भात स्वअनुभव संगितले. अध्यक्षीय समारोप करताना डॉ. रोहिदास नितोंडे यांनी युवक आणि युवतींचे भारतीय सैन्यात असणारे योगदान तसेच एनसीसी कॅडेट यांची राष्ट्रसेवेसाठीची भूमिका किती महत्वाची आहे हे अधोरेखित केले. यावेळी त्यांनी शेख नईम यांचे विशेष कौतुक केले आणि सेवा कर्तव्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार मेजर डॉ.प्रशांत सराफ यांनी केले. यावेळी ७७ एनसीसी कॅडेटस उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंजली शिंदे,माऊली जाधव,शिवम बेद्रे,पठाण अझहर,दत्ता खोंडे, शेख सादिक यांनी पुढाकार घेतला.

error: Content is protected !!