सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथे गो-ध्वजाची स्थापना
सेलू / नारायण पाटील – भारत यात्रा च्या दुसऱ्या टप्प्यात जगद् गुरू शंकराचार्य यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यात होत असलेल्या गो ध्वज स्थापना कार्यक्रमाअंतर्गत ब्रम्हवाकडी (ता. सेलू) येथील छनुभाई देसाई गोशाळा परीसरात गो ध्वज स्थापन करण्यात आला.
शंकराचार्य महाराजांनी गोमाताला राष्ट्रमाता घोषित करण्यासाठी २२ सप्टेंबर २०२४ रोजी अयोध्या धाम येथे रामकोटाची परिक्रमा करून या यात्रेची सुरुवात केली होती. ही ऐतिहासिक यात्रा पूर्वोत्तर प्रदेशातील बहुतांश राज्यांना भेट देत देशातील ३६ राज्यांच्या राजधानीत गो प्रतिष्ठा ध्वजाची स्थापना करून यशस्वीरीत्या पार पडली आहे.
या ऐतिहासिक यात्रेला मोठे यश मिळाले. जेव्हा पूज्यपाद शंकराचार्य महाराजांच्या मागणीनुसार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशी (रामा) गायीला राज्यमाता घोषित केले. याबाबत कॅबिनेट मंत्रीमंडळात झालेल्या ठरावाची प्रत जगद्गुरू शंकराचार्य यांना सुपूर्द केली. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांनी जगद्गुरु शंकराचार्यांना आमंत्रित करून पादुका पूजन करीत गायीला राज्यमातेचा दर्जा दिला.
शंकराचार्य महाराज ऐतिहासिक यात्रेच्या माध्यमातून संपूर्णतः गौहत्या बंद करून गोमातेला राष्ट्रमाता करण्यासाठी पुढाकार घेत आहेत.
छनुभाई देसाई गोशाळा परीसरात गो-ध्वज स्थापना कार्यक्रमा प्रसंगी महेंद्र तिवारी, संत त्याग्याजी महाराज यांनी उपस्थितीत नागरीकांना मार्गदर्शन केले. संस्थानचे संस्थापक अध्यक्ष राधाकिशन कदम व पदाधिकाऱ्यांसह नागरीकांनी पुढाकार घेतला.