बोरगव्हाण शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
बोरगव्हाण – दिनांक 8 मार्च 2025 रोजी बोरगव्हाण शाळेत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते जिजामाता ,सावित्रीबाई फुले,रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सौ.द्वारकाबाई इंगळे (सरपंच, बोरगव्हाण), सौ. गीतांजली गायकवाड (सॉफ्टवेअर इंजिनियर), सौ. डॉ. ममता आवटे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक पृथ्वीराज धर्मे होते. प्रमुख पाहुण्यांनी महिलांच्या हक्क, शिक्षण या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.
विद्यार्थिनींनी स्त्रीशक्तीचे महत्त्व दर्शवणारे नृत्य आणि भाषणे सादर केली. तसेच शाळेतील शिक्षिकांचा आणि महिला कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती दहिवडे मॅडम आणि आभार प्रदर्शन श्रीमती पालदेवार मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी विशेष सहकार्य केले.