तांदळात मोबाईल ठेवणे चुक की बरोबर..जाणुन घ्या सत्य काय
फोन पाण्यात पडल्यावर तो बंद पडण्याची शक्यता असते. त्यामुळे फोन पाण्यात पडल्यावर काय काळजी घ्यावी हे समजून घ्यायला हवं. आजकाल बाजारात येणारे अनेक स्मार्टफोन वॉटर प्रुफ फीचर्ससह येत असले तरी, पाण्यात पडल्यास फोन खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे, फोन पाण्यात पडल्यावर आपण काय करावं हे जाणून घेतलं पाहिजे.
तांदळात ठेवणं योग्य आहे का?
फोन पाण्यात पडल्यावर बरेच लोक सर्वात आधी फोन तांदळात ठेवतात. फोन तांदळाच्या गोणीत किंवा डब्यात ठेवल्यात फोनमधील पाणी शोषून घेतलं जातं असा काही लोकांचा समज आहे. वास्तविक, जर तुम्ही फोन पाण्यातून काढल्यानंतर त्यातलं पाणी काढण्यासाठी फोन कपड्याने पुसा आणि नंतर तो तांदळात ठेवा, काही वेळेस फोनमधील पाणी शोषून घेण्यास मदत होऊ शकते. परंतु, आयफोन निर्मात्या अॅपलने 2024 च्या सुरुवातीला एक महत्त्वाची सूचना केली होती. आयफोन कंपनीच्या मते, फोन तांदळात ठेवणे योग्य नाही. तांदळाचे छोटे कण फोनमध्ये प्रवेश करून फोनला हानी पोहचवू शकतात. त्यामुळे तांदळाच्या वापरामुळे होणारा फायदा तुलनेत कमी आणि हानी जास्त होऊ शकते.
फोन पाण्यात पडल्यास काय करावं?
फोन लगेच सुरू करू नका –
फोन पाण्यात पडल्यावर त्याला लगेच सुरू करण्याचा प्रयत्न करू नका. फोन बंद आहे तर त्याला लगेच बंद करा.
बटणं दाबू नका –
फोनच्या बटणांना अनावश्यकपणे दाबू नका.
फोन हलवू नका –
फोन कपड्याने पुसताना फोन जोरजोरात हलवू नका. कारण यामुळे पाणी आत जाऊ शकते.
सिम कार्ड आणि SD कार्ड काढा –
फोन बंद करून त्यातले सिम कार्ड आणि SD कार्ड काढा.
चार्जिंग पोर्टमध्ये पाणी घालू नका –
फोनच्या चार्जिंग पोर्टमध्ये पाणी ओतून फोनमधील पाणी अधिक पसरवू नका.
फोन पुसा –
फोनवर असलेलं पाणी कापडाने पुसून काढा.
हेअर ड्रायर किंवा मायक्रोवेव्हचा वापर नको–
फोन गरम करण्यासाठी हेअर ड्रायर किंवा मायक्रोवेव्ह वापरण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्याने फोनला अधिक नुकसान होऊ शकते. जर फोन नीट काम करत नसेल, तर मोबाइल शॉप किंवा शोरूममध्ये जाऊन तज्ञांच्या मदतीने ते तपासून घ्या.
शेवटी काय कराल?
फोन पाण्यात पडल्यावर त्याला कधीही गरम करण्याचा प्रयत्न करू नका. फोन गरम करण्यासाठी ड्रायर किंवा मायक्रोवेव्ह वापरू नका. फोन चालू न झाल्यास मोबाइल शॉप किंवा सल्लागारकडे नेऊन तो तपासून घ्या.