प पु भानुदास महाराजांच्या जन्मभूमी व कर्मभूमीची नाळ जोडणे गरजेचे-प पु सुरेश महाराज
सेलू / प्रतिनिधी – साडेगाव संस्थान चे मठाधिपती प पु भानुदास महाराज यांची कर्मभूमी जरी साडेगाव असली तरी जन्मभूमी सेलू तालुक्यातील खेर्डा आहे .त्यामुळे महाराजांच्या जन्मभूमी ची व कर्मभूमीची नाळ जोडणे अत्यंत गरजेचे आहे .व त्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन साडेगाव येथील श्रीराम संस्थान चे मठाधिपदी सुरेश महाराज रामदासी यांनी खेर्डा येथील प्रवचनातून केले.
भानुदास महाराजांची जन्मभूमी असलेल्या तालुक्यातील खेर्डा येथे महिला मंडळाच्या वतीने चार महिने चातुर्मास मध्ये केलेल्या दासबोध प
पारायनाची सांगता दि २१/११/२४ गुरुवार रोजी करण्यात आली .यावेळी साडेगाव येथील श्रीराम संस्थानचे मठाधिपती प पु सुरेश महाराज रामदासी यांची उपस्थिती होती .या कार्यक्रमात सायंकाळी सात वाजता गावकऱ्यांच्या वतीने नगर प्रदक्षणा करण्यात आली . गावामधून प्रमुख रस्त्याने निघालेल्या या नगर प्रदक्षणेत सुरेश महाराजांची उपस्थिती होती .यावेळी टाळ मृदंगाच्या गजरात हरिनामाचा गजर करीत गावकरी व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या . रस्त्यावर जागोजागी महिलांनी घरासमोर रांगोळ्या काढून व महाराजांचे औक्षवन करून स्वागत केले . मोरोती मंदिर पासून निघालेली ही नगर प्रदक्षणा शेवटी मंदिरात आली .त्यावेळी सुरेश महाराजांच्या उपस्थीतीत दासबोध ग्रँथाचे विधिवत पूजन करण्यात आले .व सामूहिक महाआरती करून दिपोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी सुरेश महाराजांनी प्रवचनात खेर्डा येथे सर्व भाविक भक्तांच्या सहकार्यातून उभारण्यात येत असलेल्या प पु भानुदास महाराजांच्या मंदिर विषयी मार्गदर्शन केले .तसेच साडेगाव येथे साजऱ्या होणाऱ्या भानुदास महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याची देखील माहिती दिली .यावेळी दासबोध पारायण ,संतपूजन ,कीर्तन याबाबत माहिती दिली .व या कार्यक्रमात खेर्डा येथील ग्रामस्थांनी देखील मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले .