कै.भा.प्र.पाटील डीएड मंचने दिली देऊ बळ जगण्याचे अंतर्गत शेळी भेट

0 59

उमर शेख
कंधार,दि 24 ः
संकल्प स्वराज्य उभारणी फाऊंडेशन चे परभणी व नांदेड जिल्ह्यातील विविध ठिकाणचे काम अतिशय देखणे व अनुकरणीय आहे. फाऊंडेशन व मंचच्या माध्यमातून अनेक कुटूंबांना मदत केली गेली आहे. निराधार, गरीब, गरजू कुटूंबांना शिलाई मशीन देणे, घर बांधून देणे, मिरची कांडप यंत्र देणे, व्यवसायाला मदत करणे, वृक्षरोपण करणे, एक मित्र -एक पुस्तक चळवळ राबविणे, एक मित्र- एक वृक्ष चळवळ मोहीम, गरजवंतांना शेळी भेट देणे,पूरग्रस्तांना मदत असेल या सारख्या अनेक उपक्रमातून फाऊंडेशन च्या वतीने मदत करण्यात आलेली आहे. मौजे गोलेगाव(प.कं) ता. लोहा जि. नांदेड येथील गरजू कुटूंब शांताबाई जळबा वाघमारे यांना छत्रपती संभाजी महाराज जयंती व बुद्धपोर्णिमा दिनाचे औचित्य साधून शेळी भेट देण्यात आली. शांताबाई व जळबा यांना उतारवयात मुलांच्या आधाराची गरज असतांना नियतीने दोन्हीं तरुण मुलांना हिरावून घेतले. दुःखाचा डोंगर घेऊन आपल्या दिव्यांग पतीला कसाबसा आधार देत इकडे तिकडे काम करून शांता काकू घर चालवतात. शेती नसल्याने व मोलमजुरी शिवाय पर्याय नसल्याने शांता काकूंना संसाराचा गाडा चालवणे अत्यंत अवघड होऊन बसले होते.अशा वेळी जगण्याचे बळ मिळावे म्हणून फाऊंडेशन व मंच च्या वतीने त्यांना शेळी भेट देण्यात आली.
फाऊंडेशनच्या माध्यमातुन प्रत्येक महिन्याला एका निराधार भगिणीस मदत म्हणून शेळी भेट दिली जाते. देऊ बळ जगण्याचे या कार्यक्रमार्तगंत मंच तर्फे अनेक गरजूंना शेळी भेट देण्यात आलेली आहे. मन्मथ बरडे यांनी सुदंर आवाजात स्वागत गीत गाऊन उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांचे हस्ते प्रतिमा पूजन व चूल पेटवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रास्ताविकातुन अंगद शेंडगे यांनी फाऊंडेशन उभारणी व मंच मधील कार्याचा थोडक्यात लेखाजोखा मांडला व संभाव्य कार्यक्रम व संकल्प व्यक्त केला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बांधकाम व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते वैजूलाल व संध्या सोनी हे दांपत्य उपस्थित होते. त्यांच्या सोबत मंच चे डॉ.केशवजी इंगोले व प्रा.सुनीता इंगोले हे ही उपस्थित होते. या वेळी सामाजिक कार्यकर्त्या संध्या सोनी यांनी फाऊंडेशन व मंच च्या कार्याचे कौतुक केले व मी आपल्या सोबत आहे व जी काही मदत लागेल त्यासाठी मी तयार आहे अशी ग्वाही दिली.मंच चे मार्गदर्शक डॉ.केशवजी इंगोले यांनी फाऊंडेशन चे काम व मंच उभारणीचा उद्देश , कामाची पद्धत या सह गरजूंना राजकारण विरहित व पारदर्शक मदत कशी मिळते हे सांगितले. शिवराज डांगे व रत्नाकर वाघमारे यांनी मनोगतातून चळवळीचे कौतुक केले व आम्ही आपल्या सोबत आहोत अशी ग्वाही दिली.कार्यक्रम स्थळी प्रमुख उपस्थितीत गावचे सरपंच केरबा केंद्रे, उपसरपंच देवानंद फुले, पोलीस पाटील अशोकराव गारोळे, ग्राम पंचायत सदस्य रावसाहेब डांगे व हणमंतराव शेंडगे ,बमुपा चे लोहा तालुकाध्यक्ष रमाकांत वाघमारे या सह फाऊंडेशन व मंच चे सदस्य अंगद शेंडगे, केशव सोळंके, मन्मथ बरडे, वर्षकेतू चिंचोले, मोहन ढगे व गावातील शिवराज डांगे,विकास गारोळे,परमेश्वर गारोळे ,रत्नाकर वाघमारे, सुनील गारोळे, हणमंत बारोळे, सोपान वाघमारे,मुक्तेश्वर शेंडगे, प्रमोद शेंडगे, रवी गारोळे, रावसाहेब एंगडे या सह इतर गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन मोहन ढगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार रावसाहेब डांगे यांनी मानले. फाऊंडेशन व मंच मध्ये जास्तीजास्त सदस्य यांनी सहभागी व्हावे असे आव्हाहन प्रा.सुभाष ढगे व भाऊसाहेब कदम यांनी केले.

error: Content is protected !!