योजना घरत यांना कै.सौ.कमलताई जामकर दर्पण पुरस्कार जाहीर

0 4

 

परभणी / प्रतिनिधी – येथील कै.सौ. कमलताई जामकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा दर्पण पुरस्कार मुंबई येथील स्मित फाउंडेशन च्या संस्थापिका योजना घरत निराधार,मनोरुग्णांची आई या समाजसेविकेला कै.सौ.कमलताई जामकर दर्पण पुरस्कार -२०२४ जाहीर करण्यात आला आहे.

 

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री भारत भूषण रावसाहेब जामकर यांनी आपल्या शुभेच्छा कमलताई जामकर यांच्या नावे सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलेला दर्पण पुरस्कार देण्याचे ठरविले तेव्हापासून हाच तागायत ही परंपरा सुरू आहे. पुरस्काराचे हे २२ वे वर्ष असून.या पुर्वी साहित्यिक रेखा बैजल, डॉ.वृषाली किन्हाळकर, डॉ.मेबल आरोळे, अनाथांची माता सिंधुताई सपकाळ, राणी बंग, डॉ.हेमलता पाटील,ॲड.सुरेखा दळवी,कु. नसीमा म हुरजूक, सौ.वैशाली पाटील, सौ.प्रतिभा शिंदे, प्रा. साधना झाडबुके,
डॉ. मंदाताई आमटे, श्रीमती मायाताई सोरटे, श्रीमती रेहमतबी करीम बेग मिर्झा, श्रीमती सुमनसिंह चौहान व श्रीमती मिठू देवी, सुलोचना कडू, श्रीमती अनुराधा कोईराला, डॉ.जोत्स्ना कुकडे. श्रीमती पिंजारीबाई उल्या पावरा, पद्मश्री राहीबाई सोमाजी पोपेरे, सौ. सुशीला विठ्ठलराव साबळे यांना प्रदान करण्यात आला.

 

२२ व्या पुरस्काराच्या मानकरी स्मित फाउंडेशन मुंबई च्या निराधार व मनोरुग्णांची आई योजना घरत यांचे निराधार वृध्द, मनोरुग्णं यांच्या साठीचे सेवाकार्य मोलाचं असं आहे. स्वतः मदर तेरेसा यांच्या अनाथ आश्रमात वाढलेल्या योजना ताई या निराधार व मनोरुग्णांसाठी कार्य करीत आहेत. महिला सक्षमीकरण, कुष्ठरोग्यांची सेवा, विशेष मूल व त्याची काळजी, निराधार साठी मागील २८ वर्षापासून सातत्यपूर्ण योजना ताईंचे कार्य सुरू आहे. सन २०१७ साली मुंबई येथे स्मित फाउंडेशन ची स्थापना केली. गरीब,अनाथ, मानसिकदृष्ट्या आजारी अशा लोकांची काळजी घेण्यात त्या समर्पित झाल्या. अशा गरजू लोकांसाठी निवासाची व्यवस्था व्हावी यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.

 

समाजातील निराधार आई-वडील हीच आपली प्रेरणा असून त्यांच्या उन्नतीसाठी त्या कार्यरत आहेत. दुःखी कष्टी अनाथ अशा लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे साठी स्मित फाउंडेशन कार्यरत आहे. योजना ताईंचे शिस्तबद्ध कार्यातून देश-विदेशातील विद्यार्थ्यांसाठी स्मित फाउंडेशन विविध शिबिरांचे आयोजन करते आजच्या हायटेक पिढीने आईवडिलांकडे दुर्लक्ष केल्याने फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे.त्यांच्यामध्ये सुमध्य साधण्याचा प्रयत्न स्मित फाऊंडेशन करीत आहे. निराधारांच्या आरोग्याची आहाराची काळजी घेत आश्रमात निवास,अन्न, आरोग्य सेवा ,शिस्त, स्वच्छता, मनोरंजन,औषधोपचार सह आर्ट ऑफ लिविंग,झुंबा,योगा, भजन,कीर्तन,हिलींग यासारख्या मनोरंजनात्मक उपक्रमातून या सर्वां मधे निरोगी आणि सकारात्मक बदलासाठी प्रयत्न फाउंडेशन सक्रिय आहे. अनेक हॉस्पिटल आणि नर्सिंग कॉलेज या कामी सहकार्य देत आहेत.

 

स्मित फाउंडेशन मुंबई यांचे कार्य लक्षात घेत.योजना घरत यांना कै.सौ. कमलताई जामकर दर्पण पुरस्कार – २०२४ साठी पुरस्काराच्या मानकरी म्हणून सौ कमलताई जामकर दर्पण पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष हेमंत जामकर ,उपाध्यक्ष ॲड.बाळासाहेब जामकर, सचिव विजय जामकर, सहसचिव अनिल मोरे, यांनी निवड झाल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

error: Content is protected !!