कराड शरणनाट्य… भास्कर जाधवांचा दावा…. त्या भेटीचा परिणाम?

0 9

बीड येथील मस्साजोग गावचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचा ९ डिसेंबरला खून झाल्याची घटना घडली होती. या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मीक कराड यांचा सहभाग असल्याचं आरोप होत आहे. देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मीक कराड फरार होता. आज वाल्मीक कराड हा पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात शरण आला.

खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड अखेरीस पुण्यात सीआयडी कार्यालयात येऊन शरण झाला. या प्रकरणावर विरोधकांनी संशय व्यक्त केला आहे.

‘ज्यांचा वाल्मिक कराडवर वरदहस्त आहे ज्यांचा हात त्याच्या डोक्यावर आहे, असे धनंजय मुंडे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत अतिथीगृहात भेट होते. त्यानंतर हालचालींना वेग आला. आता कराड खरोखर शरण आलाय की, काल दोन नेत्यांची अतिथीगृहावर भेट झाली त्याचा हा परिणाम आहे, याचा महाराष्ट्र शोध घेईलय वाल्मिक कराडला जाणीवपूर्वक लपवून ठेवलं होतं की नव्हतं पण जाणीवपूर्वक हजर मात्र केलं जात नव्हतं, याचा आता संशय येतोय, असं भास्कर जाधव म्हणाले.
‘वाल्मिक कराड गेले 20 ते 22 दिवस सरकारला मिळत नव्हता. कराडला सगळ्या ठिकाणी जाऊन शोध घेत असल्याचा सरकारचा आव आणला. त्याची प्रॉपर्टी जप्त करतोय त्यांच्या घरच्या लोकांना ताब्यात घेतोय, सरकार किती कर्तव्यदक्ष हे दाखवण्याचा सरकारचा प्रयत्न केला. पण चारही बाजूंनी सरकारवर झोड उठू लागली अनेक ठिकाणी मोर्चे काढले गेले. वाल्मिक कराड जवळच होता पण तो पोलिसांना सापडत नव्हता. पण अचानक तो आज समोर आला, हे संशयास्पद आहे, असंही जाधव म्हणाले.

‘बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद धनंजय मुंडेंनी सोडावं की एकनाथ शिंदे यांनी घ्यावं. काल परवापर्यंत सुरेश धस म्हणत होते देवेंद्र फडणवीसनी पालकमंत्री पद घ्यावं. पालकमंत्रिपद कोणी घ्यावे त्यात मला काडीचा रस नाही. पण धनंजय मुंडेंनी मंत्रिमंडळात राहू नये हे मात्र निश्चित’ असंही जाधव यांनी स्पष्टपणे सांगितलं.

 

error: Content is protected !!