माहेश्वरी युवा मंचतर्फे कारसेवकांचा सत्कार
परभणी : श्रीराम जन्मभूमी निर्माण कार्यात अमूल्य योगदान देणाऱ्या कारसेवक डॉ.मीना परतानी व संजय मुंदडा या कारसेवकाचा माहेश्वरी युवा मंच परभणीच्या वतीने सोमवारी अयोध्येतील सोहळ्यानिमित्त सत्कार करण्यात आला. श्रीराम जन्मभूमी निर्माण कार्यात योगदान देणाऱ्या कारसेवक यांचे सध्या ठिकठिकाणी स्वागत करून कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी यातूनच त्यांचा शाल, श्रीरामलला मूर्तीची प्रतिकृती देऊन सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभप्रसंगी माहेश्वरी युवा मंचचे अध्यक्ष गोपाल मुरक्या, उपाध्यक्ष श्रवण जेथलिया, आदित्य भंडारी, निलेश मानधने, डॉ.आशिष झंवर, संतोष मणियार ,योगेश बंग आदी उपस्थित होते.