कासार समाजाची मागणी भविष्यात निश्चित पूर्ण करणार-विनोद बोराडे
सेलू ( नारायण पाटील )दि २०
कासार समाज कधीच आपल्या मागणीसाठी आक्रमक होत नाहीत शांत पणे आपली मागणी मांडतात .व भविष्यात त्यांची भव्य हॉल ची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी कृतज्ञता सोहळ्यात बोलतांना दिले .
येथील कालिंका देवी मंदिरच्या रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी माजी आमदार हरिभाऊ लहाने ,माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे ,माजी जी प सभापती अशोकराव काकडे ,माजी जी प सदस्य राम खराबे ,शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख मंगल कथले ,कासार समाजाचे अखिल भारतीय अध्यक्ष शरदभाऊ भांडेकर ,मंगेशराव विभूते ,दिपकराव वनगुजरे , प्रा सुभाषजी दगडे ,मीनाताई वानरे ,नंदकिशोर शिलवंत , समाजाचे सेलूचे अध्यक्ष अशोक कासार ,माजी उपाध्यक्ष प्रभाकर सुरवसे ,मिलींद सावंत ,मारोतराव विश्वभरे ,विलासराव वानरे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती .
यावेळी मान्यवरांच्या हस्ते कालिंका देवीचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले .यानंतर उपस्थित मान्यवरांचा मंदिर संस्थानच्या वतीने कृतज्ञता सोहळा पार पडला .संस्थानच्या वतीने कार्यकारी मंडळाच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पहाराने सन्मान करण्यात आला .
आनंतकुमार विश्वभरे यांनी प्रास्ताविकात या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत उद्देश स्पष्ट केला .
यावेळी बोलतांना माजी जी प सभापती अशोक नाना काकडे यांनी देखील कासार समाजाच्या कार्याचा गौरव करून भविष्यात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले .
विभागीय अध्यक्ष शरदभाऊ भांडेकर यांनी सेलू कासार समाजाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचे व विवाह सोहळ्याचे कौतुक केले .तसेच त्यांनी समाजा साठी लावण्यात आलेल्या विविध अटींची माहिती दिली .यामध्ये लग्न सोहळ्याआधी व्हिडीओ शुटींग काढू नये ,लग्न सोहळ्यात अन्न वाया जाणार नाही .याची काळजी घ्यावी .महिलांनी रस्तावर डान्स करू नये .व विधवा महिलांचा योग्य तो सन्मान करावा असे स्पष्ट केले . यावेळी या रोप्य महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विजयी स्पर्धकांना पारितोषक व शालेय परीक्षेतील यशस्वी विध्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोकराव वानरे व गजानन हेलसकर यांनी केले
शेवटी राजश्री आनंतकुमार विश्वभरे यांनी उपस्थितांचे आभार मानले .दोन विवाह सोहळे संपन्न झाल्यानंतर समाजबांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेतला .