कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीनंतर भीषण अग्नीतांडव

fire broke out at prayagraj mahakumbh 15 tents affected sgk / Mahakumbh fire a massive fire broke out at the maha kumbh mela area in prayagraj

0 69

महाकुंभाचा सेक्टर २२ छतनाग घाट आणि झुशीच्या नागेश्वर घाटाच्या दरम्यान येतो. येथे असलेल्या तंबूत अचानक आग लागली. त्यामुळे लोक सावध झाले. याबाबत भाविकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली.चमनगंज झुंसीजवळील जुना आखाड्याच्या छावणीत लागलेल्या आगीत १५ तंबू जळून खाक झाले. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

 

महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येला चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाल्यानंतर आज आज लागली आहे.ही आग अत्यंत भीषण असल्याचं सांगितलं जात आहे. कापडी तंबू असल्याने आणि हवा असल्याने आग अधिकच भडकली. यावेळी अग्निशमन दलाला तात्काळ माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी युद्धपातळीवर आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या आगीत असंख्य तंबू जळून खाक झाले आहेत. मात्र, कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचं सांगण्यात आलं.

 

या आधी 19 जानेवारी रोजीही महाकुंभमध्ये आग लागली होती. सेक्टर 19मधील गीता प्रेसच्या तंबूंना ही आग लागली होती. त्यावेळीही अनेक तंबू जळून खाक झाले होते. यावेळी सिलिंडर स्फोट झाला होता. त्यामुळे आग चांगलीच भडकली होती. हवेत धुराचे लोळ दिसत होते. मात्र, त्यावेळीही अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखून आगीवर नियंत्रण मिळवलं होतं. त्यामुळे एक मोठी दुर्घटना होता होता वाचली होती.

 

अग्निशमन विभागाचे अधिकारी प्रमोद शर्मा म्हणाले, “आज आम्हाला छतनाग घाट पोलीस स्टेशन परिसरातील १५ तंबूंमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. तात्काळ कारवाई करण्यात आली आणि आग आटोक्यात आणण्यात आली. हा एक अनधिकृत तंबू होता . परिस्थिती नियंत्रणात आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

error: Content is protected !!