लोअर दुधना धरणातून पाण्याचे तीन आवर्तन
सेलू (प्रतिनिधी) दि 13
येत्या उन्हाळी हंगामात लोअर दुधना धरणातून पाणी पाळ्याचे तीन आवर्तन मधून पाणी सोडण्यात येणार आहे.यामुळे उन्हाळी पिकांसह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटणार आहे.यामुळे शेतकऱ्यांमधूम समाधान व्यक्त होत आहे.परंतु धरणातून सोडलेल्या पाण्याचा सर्वांनी योग्य वापर करावा तसेच पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता प्रसाद लांब यांनी केले आहे.
गेल्यावर्षी पाण्याचे दुर्भिक्ष होते परंतु यंदा दमदार पाऊस झाल्याने निम्न दुधना प्रकल्पात सद्यःस्थितीत ५० टक्के जिवंत पाणीसाठा आहे. त्यामुळे सेलू शहराला पाणीपूरवठा कमी पडणात नाही. तसेच 3 वेळा आवर्तनातून पाणी सोडण्यात येत असल्याने उन्हाळी पिकांसह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न यंदा निकाली निघाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
ऑक्टोबर महिन्यात प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा असल्यामुळे संबंधित विभागाकडून रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांना तीन पाणी आवर्तन सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानंतर नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांत पहिले, जानेवारीत दुसरे तर फेब्रुवारी महिन्यात तिसरे पाणी आवर्तन देण्यात आले होते. १४ ते १७दिवस डाव्या व उजव्या कालव्यात पाणी सोडल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना आधार मिळाला. सेलू, मानवत, जिंतूर व परभणी तालुक्यांतील कालवा लाभक्षेत्रातील जवळपास ६ हजार हेक्टरवरील पिकांना सिंचनाची सोय झाली.यावेळी 12 मार्च ते 25 मार्च 9 एप्रिल ते 22 एप्रिल
7 मे ते 20 मे 2025 या दरम्यान पाणी पाळी होणार असून पाणी सोडण्यात येणार आहे.
या प्रकल्पातून उन्हाळी पिकांनाही मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत १४ दिवस तीन आवर्तने सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे उन्हाळी पिकांसह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न काही अंशी निकाली निघणार आहे. प्रकल्पातून सेलू, परतूर व मंठा या शहरांसह शेकडो गावांना पाणीपुरवठा केला जातो.