सेलूचे भूमिपुत्र प्रणिल गिल्डा यांना ‘महेश प्रतिभा गौरव’ पुरस्कार

0 26

 

सेलू / नारायण पाटील – सेलू येथील भूमीपुत्र तथा मिरज येथील उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांना महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा यांच्या वतीने सेठ सितारामजी सुखदेवजी बिहाणी (बंगडीवाला) स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा ‘महेश प्रतिभा गौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

 

प्रदेशाध्यक्ष मधुसूदन गांधी, प्रदेश मंत्री सत्यनारायण सारडा यांनी पुरस्कार निवडीबाबत पत्राद्वारे कळविले आहे. सार्वजनिक प्रशासन क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल प्रणिल गिल्डा यांना महेश प्रतिभा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील महेश सांस्कृतिक भवन येथे रविवारी, ११ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित विशेष समारंभात प्रदान करण्यात येणार आहे. श्री. गिल्डा यांना याआधी माहेश्वरी प्रोफेशन फोरम पुणे यांचा उत्कृष्ट युवा अधिकारी पुरस्कार, गडचिरोली येथे कार्यरत असताना विशेष कामगिरी केल्याबद्दल पोलीस महासंचालक पदक तसेच पोलीस विभागातील विशेष सेवा पदकानेही त्यांचा सन्मान झालेला आहे. पुरस्काराबद्दल श्री गिल्डा यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!