मराठ्यांच्या नादी लागू नका-आता..मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

0 73

पुणे: मराठ्यांचे नशीब खुप बळकट आहे. सरकार सोडले तर आमच्यावर आतापर्यंत कोणीही अत्याचार केला नाही. मराठ्यांच्या नादी लागू नका, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.आरक्षणासाठी काल आपल्या एका बांधवाने बलिदान दिलं. आता या पुढे एकही बलिदान वाया जाऊ द्यायचं नाही. काहीही होऊ द्या. एकही बलिदान वाया जाऊ द्यायचं नाही. आरक्षण घेतल्याशिवाय राहायचं नाही. आरक्षण घेऊनच माघार घ्यायची, अशी गर्जनाच मनोज जरांगे पाटील यांनी केली. सरकारला दिलेली मुदत संपायला अवघे चार दिवस बाकी आहेत. त्यापूर्वीच जरांगे पाटील यांनी हा इशारा दिला आहे.

 

मराठ्यांच्या बाजूने लढण्यासाठी मनोज जरांगे हे मैदानात उतरले आहेत. राज्यभर त्यांच्या सभा सुरु आहेत. त्यात आज राजगुरुनगर येथे जंगी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी भाषणादरम्यान त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.
यावेळी जरांगे म्हणाले की, आमच्या मराठा बांधवानी टोकाचं पाऊल उचललं आहे. त्यांना फक्त सरकार जबाबदार आहे. दुसरं कोणीही नाही. कारण या सरकारने वेळेवर आम्हाला आरक्षण दिलं असतं तर या घटना घडल्या नसल्याच नसत्या. मी माझ्या मराठा समाजाच्या शब्दापुढे कधीही जाणार नाही. मी माझ्या समाजाला माय बाप म्हणतो. मग माझ्या समाजाची काळजी मी नाही करणार तर कोण करणार तसेच मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. मनोज जरांगे हे युद्ध रोखण्याची ताकद कुणाच्यात नाही. मराठ्यांना आरक्षण द्यायचंच हा माझा शब्द आहे. आरक्षण घेतल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नसल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे पाटील यांची आज पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरमध्ये प्रचंड सभा पार पडली. पश्चिम महाराष्ट्रातील जरांगे पाटील यांची ही पहिलीच सभा होती. पश्चिम महाराष्ट्रातील जरांगे पाटील यांची सभा यशस्वी होणार की नाही? अशी चर्चा सुरू होती. पण जरांगे पाटील यांची ही सभा प्रचंड मोठी झाली. या सभेला हजारो मराठे उपस्थित होते. उन्हातान्हातही लोक येऊन बसले होते. अत्यंत शांततेत ही सभा सुरू आहे. या सभेतूनच जरांगे पाटील यांनी सरकारला गंभीर इशारा दिला.

सरकारच जबाबदार

आपल्यावर सरकार सोडून कोणीच अन्याय करत नाही. अंतरवलीतील सभेएवढी मोठी सभा आहे. हे पुणेरी मराठे आहेत. यांच्या नादी लागू नका. काल एकाने आरक्षणासाठी मुंबईत आत्महत्या केली. आपल्यातील एक लेकरून गेलं. कावळे नावाच्या बांधवाने आत्महत्या केली. आपण त्याचं बलिदान वाया जाऊ द्यायचं नाही. सरकारच्या भूमिकेमुळे आमचे बळी जात आहे. आमच्या आत्महत्या होण्याला सरकार जबाबदार आहे, असं जरांगे पाटील म्हणाले.

error: Content is protected !!