पोखर्णीत मराठा समाजाचे मुंडन आंदोलन,अर्धनग्न होत शासनाचा निषेध
परभणी,दि 30 ः
मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या दुसर्या टप्प्यातील आंदोलनाला पाठिंबा म्हणून शुक्रवार (दि.27)पासून पोखर्णी नृसिंह येथे सकल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत साखळी उपोषणाला मराठा समाजाच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे.
सोमवारी आंदोलनाच्या (दि.30) चौथ्या दिवशी या उपोषणात पोखर्णी,वडगाव,ब्रम्हपुरी येथील मराठा युवकांनी मुंडन आंदोलन केले.तसेच अर्धनग्न होत शासनाचा निषेध केला.यावेळी मराठा बांधवांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे अशी आग्रही मागणी केली. तसेच मराठा समाजाला तात्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशा भावना व्यक्त केल्या.पोखर्णी येथे विविध गावातील सकल मराठा समाज आंदोलन करत आहे.