महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पुन्हा ‘मास्क सक्ती’, सर्व शासकीय कार्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र

0 608

 

नागपुर, प्रतीनिधी – चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक पुन्हा सुरू झाल्याने भारतात आतापासूनच खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. केंद्राने महत्त्वाचे निर्देश दिल्यानंतर आता राज्यसरकारही सतर्क झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आता नागपूरमध्ये शासकीय कार्यालयात मास्क सक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी या संदर्भात एक पत्रक काढले आहे.

 

सद्य स्थितीत कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगातल्या अनेक देशांमध्ये कोविड-19 आजाराची लाट पसरली आहे. या विषाणूचा शिरकाव भारतात होऊन पुन्हा एकदा कोरोनाच्या चौथ्या लाटेचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि प्रसार रोखण्यासाठी मास्कचा उपयोग हे प्रभावी साधन आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील आणि ग्रामीण भागातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यलाय, अस्थापन येथील अधिकारी आणि कर्मचारी तसंच भेट देणारे नागरिक यांनी मास्कचा वापर करावा, असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

 

दरम्यान, नागपूर शहरात कोरोना चाचण्या वाढवण्यात याव्या. तसेच लसीकरण देखील वाढवण्यात यावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. शहरात 39 केंद्रावर लसीकरण सूरू आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत विलगीकरण कक्ष आणि रुग्णालयात राखीव खाटा ठेवण्याच्या सूचना देखील मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केल्या आहेत.

error: Content is protected !!