धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात आरक्षण देऊन त्याची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी पाथरीत भव्य मोर्चा

0 50

पाथरी / रमेश बिजुले – पाथरी धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात आरक्षण देऊन त्याची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी पाथरीत शुक्रवार २० ऑक्टोबर रोजी वारू आंदोलन मोर्चा काढण्यात आला. भंडाऱ्याची उथळण करत शेळ्यामेंढ्यासह धनगर समाज बांधव या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

धनगर समाजाला १९६१ पासून भारत सरकारने घटनेप्रमाणे दिलेल्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी सकल धनगर समाज बांधवांनी पाथरी तहसीलवर मोर्चा काढला. यावेळी पारंपरिक वेशभूषे मध्ये आलेल्या धनगर समाज बांधवांनी भंडाऱ्याची उधळण करत सर्वांचे लक्ष वेधले होते. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीपासुन या मोर्चाला सुरुवात झाली होती. यावेळी पारंपरिक वाद्य वाजवत भंडाऱ्याची उधळण आणि मेंढ्याच्या कळपासह निघालेला मोर्चा नागरीकांचे लक्ष वेधून घेत होता. राष्ट्रीय महामार्गावरील सेलू कॉर्नर पासून आंदोलक मोर्चेकरी यांनी तहसील कार्यालय येथे येत प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले.

 

 

यावेळी जि. बँकेचे संचालक दत्तराव मायंदळे यांच्यासह गंगाधर डुकरे, सुरेश शिंदे,ज्ञानोबा नेमाने, सरपंच साहेबराव बिटे माजी सरपंच दत्ता नेमाने. श्रावण महाराज ,बाबा दुगाणे, दिलीप धरपडे, धनु डुकरे, आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने सकल धनगर समाज बांधव यांची उपस्थिती होती.

 

 

प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन महाराष्ट्राच्या आदिवासी यादीतील धनगर ऐवजी धनगर अशी दुरुस्ती करण्याची शिफारस राज्य शासनाने केंद्र शासनाला त्वरित करण्यात यावा, महाराष्ट्राच्या आदिवासी यादीतील धनगड ऐवजी धनगर अशी दुरुस्ती करण्याचा त्या अध्यादेश माननीय राष्ट्रपती महोदय यांच्या स्वाक्षरीने केंद्र शासनाने त्वरित करण्यात यावा व तसे बील लोकसभा व राज्यसभेत मंजूर करून घेण्यात यावे, महाराष्ट्र राज्यातील धनगर ही जमात आदिवासींच्या यादीमध्ये समाविष्ट आहे तथापि २११ यादी धनगर असा उल्लेख झाल्याने आदिवासीचे दाखले मिळत नाहीत ही दुरुस्ती करून आदिवासीचे त्वरित दाखले देण्यात यावे यासह एकूण ३५ मागण्यांचे निवेदन प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. तालुक्यातील धनगर समाज मोठ्या संख्येने मोर्चा मध्ये सहभागी घेतला होता.

error: Content is protected !!