प्लास्टिक मुक्त राजधानी किल्ले रायगड साठी सरसावले नाशिकचे मावळे
रामभाऊ आवारे
निफाड प्रतिनिधी
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचा राज्यभिषेक सोहळा सहा जून रोजी राजधानी दुर्गराज श्रीमान रायगडावर मोठ्या उत्साहात पार पडला. शिवरायांना अभिवादन व मुजरा करण्यासाठी हजारो शिवभक्त देश्याच्या कान्याकोपर्यातून लाखोंच्या संखेने शिवप्रेमी रायगडावर आले होते.
सोहळा अतिशय नेत्रदीपक यात शंकाच नाही पण गडावर, येणार्यामध्ये कट्टर शिवभक्त असतात. तर बरेच हौशे नवशे गवशे पर्यटक पण सोहळा पाहण्यासाठी येतात. हे पर्यटक गडावर येताना किंव्हा पायउतार होताना प्रचंड प्लास्टिक कचरा, (पाणी बॉटल, कुरकुरे पकेट, जेवणाचे पकेट, रपर) गडावरच सोडून जातात. ज्या रायगडाने एके काळी सुवर्ण काळ पाहिला, जो रायगड स्वराज्याची राजधानी म्हणून राहिला, ज्या रायगडावर राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय , छत्रपती शंभू राजे यांचा बराच काळ तेथेच गेला त्याच रायगडावर आजही शिव समाधी आहे. त्या गडावर खर तर अजिबात घन, कचरा होता कामा नये, आपण येथे येताना कसे वागले पाहिजे याचे गांभीर्य प्रत्येकाला समजायला पाहिजे . शिवराय फक्त डोक्यावर मिरवण्याचा विषय नाही त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे आचरण पण झाले पाहिजे. गडावर होणारा प्रचंड कचरा, प्लास्टिक गडाचे पावित्र्य व सौंदर्य नष्ट करतो. हीच बाब लक्षात घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात गडकिल्यांवर स्वच्छता व संवर्धनाचे कार्य करणाऱ्या राजा शिवछत्रपती परिवाराच्या नाशिक , जळगाव, धाराशिव व इतर एकून सत्तर मावळ्यांनी , रणरागीणींनी व बाल मावळ्यांनी प्लास्टिक मुक्त रायगड मोहिमेचे आयोजन केले व बाल मावळ्यांनी आठ जून रोजी रायगडाच्या पायथ्याला मुक्काम करून नउ जूनला सकाळी सहा वाजेला ला नाश्ता करून मोहिमेला सुरवात. चित्त दरवाजा व नाणे दरवाजा या दोन्ही मार्गाच्या अरुंद दरीतून तसेच रस्त्यात कडेला असणार्या प्लास्टिक बॉटल व इतर कचरा पिशव्यांमध्ये जमा केला. दुर्दैवाची बाब म्हणजे हे काम करत असताना दारूच्या बाटल्या ही सापडल्या .याबाबत तीव्र संताप व खंत व्यक्त केली. राज सदरेवर व शिव समाधीवर जाऊन मावळ्यांनी शिवरायांना मानाचा मुजरा केला पुष्पहार अर्पण करून व पाच सहा तास चाललेल्या मोहिमेची सांगता केली या मोहिमेत तब्बल चाळीस ते पंचेचाळीस गोणी प्लास्टिक कचरा जमा झाला तरीही अजून रायगडावर बराच कचरा पडलेला आहे. राज्यातील बर्याच संघटना हे काम करत आहे. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी तिन्ही विभागातील मावळ्यांनी परिश्रम घेतले.
नाशिक विभागाचे विभाग प्रमुख विकास भोसले यांनी असे आव्हान केले की, गड-किल्ले हे आपला वारसा आहे ते जपणे आपले कर्तव्य आहे, त्यासाठी गडकोटांवर फिरायला जाताना तेथील ऐतिहासिक वास्तुचे जपणुक करा,तसेच सोबत घेतलेले पाणी बाटली, कुरकुरे व इतरचा कचर्याचे प्लास्टिकच्या पिशव्या गडकोटावर न टाकता कचरा कुंडी मध्ये टाका किंवा सोबत परत घेऊन यावे व त्याची योग्य विल्हेवाट लावावी असा बहुमूल्य आव्हान त्यांनी सर्वांना केले.