एम.सी.व्ही.सी. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी भरती मेळाव्याचा लाभ घ्यावा- प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव यांचे आवाहन
परभणी,दि 26 (प्रतिनिधी)ः
कौशल्य विकास व उद्योजकता विभाग महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांच्या मार्गदर्शनानुसार दिनांक ४ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता ज्ञानोपासक महाविद्यालय, परभणी येथे एमसीव्हीसी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष २०१९ ते २०२१ या वर्षी उत्तीर्ण झालेले सर्व एमसीव्हीसी शाखेतील विद्यार्थी या संधीचा लाभ घेऊ शकतात. या मेळाव्यासाठी राज्यभरातील नामांकित कंपन्या व उद्योग व्यवसायातील अधिकारी तसेच आस्थापना उपस्थित राहून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहेत. या संधीचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव यांनी केले. सदरील कार्यक्रमासाठी आयोजक जिल्ह्याचे जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी डॉ. प्रवीण उखळीकर तसेच परभणी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील व्यवसायिक शिक्षण अध्यापन करणारे सर्व प्राध्यापक उपस्थित राहणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ.जाधव यांनी दिली.
या मेळाव्यासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन प्राचार्य डॉ बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य आप्पाराव डहाळे, पर्यवेक्षक नारायण राऊत, प्रबंधक विजय मोरे, एम सी व्ही सी विभागप्रमुख प्रा.सतिशचंद्र जाधव, प्रा.बाबासाहेब जाधव, प्रा.एस. एन. रेंगे आदींनी केले.