‘मी सावित्रीबाई बोलतेय’ एकपात्री अभिनयातून सावित्रीबाई फुलेंना अभिवादन

0 36

निफाड / रामभाऊ आवारे – वनसगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने स्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती तथा बालिका दिन साजरा करण्यात आला.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ.उमा चव्हाण ह्या होत्या.व्यासपीठावर विद्यालयाचे प्राचार्य सी.डी.रोटे ,पर्यवेक्षक के. बी .दरेकर, कु.प्राची शिंदे (६ अ) यांचेसह सेवक वर्ग उपस्थित होते.या प्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन संपन्न झाले. याप्रसंगी अनेक बालवक्त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेतला. कु.संस्कृती रमेश शिंदे (९ अ) या विद्यार्थिनीने ‘मी सावित्री बोलतेय…’ हा एकपात्री प्रयोग सादर करून उपस्थितांची मने जिंकली.कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.उमा चव्हाण यांनी बालिका दिनानिमित्त मनोगतात म्हटले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणाची सोय करून खऱ्या अर्थाने महिलांना सक्षम बनविण्याचा दुर दृष्टिकोन ठेवून त्याकाळी उचललेले पाऊस पाऊल निश्चितच भूषणावह असून त्यांच्या आदर्श विचारांची आजच्या स्त्रीने आदर्श घेण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ उमा (जयश्री) चव्हाण यांनी मुलींसाठी झटपट प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करुन ५ वी ते ७ वी लहान गटासाठी व ८ वी ते १० वी मोठा गटासाठी ५ प्रश्न विचारून तात्काळ उत्तरे देणा-या विजेत्या विद्यार्थ्यांना शै.साहित्य बक्षिसे देण्यात आली.विजेते :- लहान गट
प्रथम- श्रावणी शिंदे ,द्वितीय – तन्वी शिंदे
मोठा गट प्रथम – सृष्टी जाधव ,द्वितीय – श्रावणी शिंदे,तृतीय – अनुष्का शिंदे ,स्नेहा शिंदे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. श्रावणी शिंदे व स्नेहा भवर (९अ ) यांनी केले. इ.९ वी अ च्या वर्गशिक्षिका श्रीम.प्रिती काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नववी अ मधील विद्यार्थ्यांनी अतिशय नेटकेपणाने कार्यक्रम संपन्न केला.

error: Content is protected !!