परभणीत 2 फेब्रुवारी रोजी मराठा वधु वर परिचय मेळावा

0 1

परभणी,दि 12  प्रतिनिधी
मराठा प्रवाह समन्वय समितीच्या वतीने 2 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता मराठवाडा विभागीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात 12 जानेवारी 2025 रोजी जिजाऊ मंदिर वसमत रोड येथे संत, महंत व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. यावेळी ह भ प अच्युत महाराज दस्तापुरकर यांनी वधु वर परिचय मेळावे घेणे ही काळाची गरज असून या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त मराठा बांधवांनी लाभ घ्यावा असे अहवाल याप्रसंगी करण्यात आले.

परभणी शहरात मराठा प्रवाह समन्वय समितीच्या वतीने गेल्या 6 वर्षापासून वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले जाते. या 7 व्या वर्षी 2 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका जिजाऊ जन्मोत्सवा निमित्त आयोजित कार्यक्रमत जिजाऊ मंदिरात 12 जानेवारी 2025 रोजी ह भ प अच्युत महाराज दस्तापुरकर व ह भ प बालासाहेब महाराज मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वधू वर परिचय मेळावे व सामूहिक विवाह सोहळे ही काळाची गरज यासाठी आपण पुढे येणे गरजेचे असल्याचे मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी कार्यक्रम आयोजन समितीचे अध्यक्ष धाराजी भुसारे यांनी वधु वरांच्या पालकांनी आपल्या वधू-वरांची नाव नोंदणी करावी ही नोंदणी विनामूल्य असून प्रत्यक्षात परभणीत मराठा वधु वर परिचय कार्यालय, क्षीरसागर हॉस्पिटल बाजूला शिवाजीनगर परभणी येथे किंवा या 98 23 12 52 27, 94 21 87 31 83, 86 98 38 90 54 व 80 0 75 86 10 2 या नंबर वर आपल्या मुला मुलींचे बायोडाटा टाकून नोंदणी करून घ्यावी. गतवर्षी झालेल्या वधू वर परिचय मेळाव्यात वधु 254 तर वरांच्या 515 नोंदी आल्या होत्या यात परभणी,हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, संभाजीनगर सह विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील पालकांनी सहभाग नोंदविला होता. या कार्यक्रमात मराठवाडा विभागीय वधु वर परिचय मेळावा 2025 चे सर्व आयोजन समितीचे सदस्य तसेच मराठा महासंघाच्या सर्व पदाधिकारी,सदस्यांनी सहभाग नोंदविला

error: Content is protected !!