समृध्दीसाठी जमिन गेलेल्या शेतकऱ्यांना मिळणार पाचपट मावेजा-आमदार डॉ.राहूल पाटील यांच्या लक्षवेधीवर मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

0 103

परभणी,दि 29 (प्रतिनिधी)ः
नागपूर- मुंबई समृध्दी महामार्गाच्या धर्तीवर रेडी रेकनर दराच्या पाचपटीने परभणी जिल्ह्यातून जाणाºया समृध्दी महामार्गाचा मोबदला संबंधित शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. या संदर्भात आमदार डॉ.राहूल पाटील यांनी विधानसभेत मंगळवार, दि़२८ डिसेंबर रोजी लक्षवेधी प्रश्न मांडला होता़
नागपूर- मुंबई दरम्यान समृध्दी महामार्गाचे काम सुरू आहे़ या महामार्गाला जोडणाºया जालना ते नांदेड या समृध्दी महामार्गास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे़ हा महामार्ग परभणी जिल्ह्यातील ४४ गावांमधून जाणार आहे़ या संदर्भातील आदेश ६ सप्टेंबर रोजी राज्य शासनाने काढला आहे. तसेच याबाबतची अधिसूचनाही प्रसिध्द केली आहे़ परभणी जिल्ह्यातील सेलू, जिंतूर, परभणी, पूर्णा या चार तालुक्यातून हा महामार्ग जात आहे. या महामार्गासाठी लागणाºया जमिनीचे भूसंपादन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात येणार आहे़ सदरील भूसंपादनाचा मावेजा संबंधित शेतकऱ्यांना मिळण्याबाबत जिल्ह्यात विविध चर्चा सुरू होत्या़ या पार्श्वभुमीवर आमदार डॉ.राहूल पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता़ याद्वारे राज्य शासनाने शेतकºयांना मोबदला देण्यासंदर्भात आपली भुमिक स्पष्ट करावी अशी मागणी केली होती़
या अनुषंगाने उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नागपूर- मुंबई समृध्दी महामार्गाच्या धर्तीवर परभणी जिल्ह्यातून जाणाºया द्रूतगती महामार्गासाठी जमीन संपादनाचा मोबदला दिला जाणार आहे़ रेडी रेकनर दराच्या पाचपट मोबदला देण्यात येणार आहे़ त्यामुळे शेतकºयांनी कसलाही गैरसमज करून घेवू नसे असे मंत्री शिंदे यांनी सभागृहात सांगितले असल्याचे आ़डॉ़पाटील यांनी माहिती दिली आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना जमीन संपादन मोबदल्या बाबतच्या शंका दूर होणार असल्याचे आमदार डॉ. पाटील यांनी सांगितले आहे़
दरम्यान जिल्ह्यातून जाणाºया जालना- नांदेड स्मृध्दी द्रूतगती महामार्गावर दुधना, पूर्णा नदीवर तसेच पूर्णा- अकोला आणि पूर्णा- नांदेड रेल्वेमार्गा ओलांडण्यासाठी तसेच देवगाव ते सूल, जिंतूर ते परभणी रस्त्यावर टाकळी कुंभकर्ण जवळ, परभणी ते वसमत रस्त्यावर झिरो फाट्याजवळ पूल उभारण्यात येणार आहेत़ याशिवाय पूर्णा ते नांदेड रस्त्यावर महत्वाची इंटरचेंजची बांधकामे करण्यात येणार आहेत़

error: Content is protected !!