आमदार राजेश विटेकर यांनी केली नुकसानीची पाहणी
परभणी,दि 12 ः
परभणीत बंद दरम्यान झालेल्या हिंसक घटनेच्या नुकसानीची पाहणी पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनी गुरुवार दिनांक 12 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता केली.नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करू तसेच गतीने पंचनामे करा अशा सूचना आ.विटेकर यांनी दिल्या.
परभणीत संविधान शिल्पाच्या अवमान प्रकरणाचा निषेध करण्यासाठी 11 डिसेंबरला बंद पुकारण्यात आला होता. या बंदला हिंसक वळण लागले. यामध्ये स्टेशन रोड, गांधी पार्क,छत्रपती शिवाजी चौक या भागात व्यापारी बांधवांचे मोठे नुकसान झाले,आंदोलनकर्त्यांनी शहराच्या विविध भागात तोडफोड करत जाळपोळ केली. या घटनेनंतर आमदार राजेश विटेकर यांनी गुरुवारी नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांची भेट घेतली.शहराच्या विविध भागात त्यांनी केली. महसूल आणि मनपा कर्मचाऱ्यांना घटनास्थळी बोलावून जलदगतीने पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या. व्यापाऱ्यांना पूर्ण नुकसान भरपाई मिळेल यासाठी योग्य अहवाल द्या अशा सूचना केल्या.