जवान राजीव मुंडे यांच्या निधनामुळे पाताळगंगा गावावर शोककळा,शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

0 66

उमर शेख
कंधार,दि 21 ः
कंधार तालुक्यातील पातळगंगा येथील रहिवासी असलेले राजीव मुंडे हे सन 2007 साली राज्य राखीव पोलीस दलात नियुक्त झाले होते.त्यांनी पंधरा वर्षे पोलिस दलात कर्तव्य बजावले. सध्या ते औरंगाबाद येथे कार्यरत होते. घरगुती कामासाठी ते आठ दिवसापूर्वी रज्जा घेऊन राहत्या गावी आले होते. दिनांक 19 मार्च रोजी सायंकाळी 4च्या सुमारास घरगुती काम करत असताना त्यांना विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. राजीव मुंडे यांच्या दुःखद निधनाने पाताळगंगा या गावावर शोककळा पसरली आहे .दिनांक 20 मार्च रोजी त्यांच्यावर पाताळगंगा या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्य राखीव पोलीस दलाच्या वतिने अखेरची सलामी देण्यात आली. राजू मुंडे यांच्या अंत्यविधीसाठी तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. भारत माता की जय वंदे मातरम या घोषणा ने राजीव मुंडे यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
कंधार तालुक्यातील मौजे पातळ गंगा येथील राजीव देविदास मुंडे वय 40 वर्षे हे 2007 मध्ये राज्य राखीव पोलिस दलात दाखल झाले होते.औरंगाबाद येथे राज्य राखीव पोलीस दलाच्या(एसआरपीएफ)गट क्रमांक 14 मध्ये पोलीस हवालदार पदावर कार्यरत होते घराचे बांधकाम करण्यासाठी ते सुट्टीवर गावाकडे आले होते त्यांच्या घरावर वरून विजेचे तार गेले होते या तारेला शाॕक लागु शनिवारी 19 मार्च रोजी चार वाजेच्या सुमारास विजेचा शॉक लागून त्यांच्या जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांचा मृतदेह कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आल्या. याप्रकरणी माळाकोळी पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन अकस्मात मृत्यूची नोंद केली. राजीव मुंडे यांचे पार्थिव वैकुंठ कथा द्वारे रविवारी 20 मार्च रोजी सकाळी 10 वाजता त्यांच्या गावी पातळगंगा येथे आणण्यात आले. सर्वप्रथम मुंडे कुटुंबीयांच्या घरी काही वेळ पार्थिव ठेवण्यात आले. यावेळी आई वडील भाऊ बहीण पत्नी मुलगी व मुलाने पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. त्यानंतर वैकुंठ रथ आवरून पार्थिवाची अंतिम यात्रा काढण्यात आले यावेळी भारत माता की जय वंदे मातरम राजू मुंडे अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या गावाच्या पूर्व दिशेला असलेल्या समशान भूमी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले राजीव मुंडे यांचा भाऊ नामदेव मुंडे यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिली तत्पूर्वी पोलीस हवालदार राजू मुंडे यांना अनेकांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली त्यानंतर राज्य राखीव पोलिस दलाचे जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले माजी सैनिक विकास समितीचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवार माजी पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण भगवान मुंडे मंडळ अधिकारी शेख साहेबांची भोकर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अशोक मुंडे, पातळगंगा गावचे सरपंच उद्धव फिरत वाढ उपसरपंच अंगत राव मुंडे ग्रामसेवक रमेश राठोड उंब्रचे सरपंच परसराम तोरणे भास्करराव तिडके नारायण मुंडे सुंदर सिंग राठोड आधीच पंचक्रोशीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट
राजू मुंडे हे सन 2007 साली राज्य राखीव पोलीस दलात नियुक्त झाले होते. त्यांनी पंधरा वर्षाच्या कार्यकाळात अनेक ठिकाणी कर्तव्य बजावले एवढेच नव्हे तर दिल्ली,उत्तर प्रदेश,मध्यप्रदेश,छत्तीसगड, गडचिरोली अशा अनेक ठिकाणी त्यांनी आपले कर्तव्य बजावले आहे.

error: Content is protected !!