MPSC लवकरचं ७५०० रिक्त पदे भरणार, पहा कोणत्या विभागात किती पदे रिक्त
मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०२१ वर्षाअखेरपर्यंत राज्याच्या विविध विभागांकडून रिक्त जागांचे माहिती पत्र मागवले होते. या माहितीपत्रात एमपीएससीअंतर्गत तब्बल ७,५६० जागा रिक्त असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे येत्या वर्षात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. जाहिरात प्रसिद्ध झालेली पदे वगळून अन्य पदांसाठीची जाहिरात आवश्यक बाबींची पूर्तता झाल्यानंतर नजीकच्या काळात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
राज्याच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये विशेष अ, ब आणि क गटांतील एकूण किती पदे रिक्त आहेत, याबाबतचे मागणीपत्र देण्यास एमपीएससीने सांगितले होते. तसेच राज्याच्या २५ विभागांमधील रिक्त असलेल्या पदांची संख्या एमपीएससीकडे प्राप्त झाली असून, राज्यात तिन्ही गटांच्या एकूण ७,५६० जागा रिक्त आहेत. त्यात ‘अ’ गटातील १४९९, ‘ब’ गटातील १,२४५ आणि ‘क’ गटातील १,५८३ पदांचा समावेश आहे.
जाहिरात प्रसिद्ध झालेली पदे वगळून अन्य पदांसाठीची जाहिरात आवश्यक बाबींची पूर्तता झाल्यानंतर नजीकच्या काळात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भातील सविस्तर यादी एमपीएससीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे एमपीएससीने परीक्षांचे वेळापत्रक आणि जाहिराती लवकर प्रसिद्ध कराव्यात, अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत.
एमपीएससीकडे प्राप्त मागणीपत्र
कृषी, पशुसंवर्धन
मत्स्यव्यवसाय : ९२४
उद्योग, ऊर्जा, कामगार : २७९
अन्न, नागरी पुरवठा
ग्राहक संरक्षण : ६२
पाणीपुरवठा व स्वच्छता : १६
सामान्य प्रशासन : ९५७
मराठी भाषा : २१
आदिवासी विभाग : ०७
मुंबई महापालिका : २१
पर्यावरण : ०३
गृह : ११५९
वित्त : ३५६
वैद्यकीय शिक्षण
औषधी द्रव्ये : १५७२
उच्च व तंत्रशिक्षण : ३५
शालेय शिक्षण, क्रीडा : १०५ऑ
सहकार, पणन, वस्त्रोद्योग : ३२
कौशल्य विकास, उद्योजकता : १७१
महसूल व वन : १०४
ग्रामविकास व पंचायतराज : ३२
नगरविकास : ९०
मृदा व जलसंधारण : ११
जलसंपदा : ३२३
विधि व न्याय : २०५
नियोजन : ५५
सार्वजनिक आरोग्य : ९३७
कृषी, पशुसंवर्धन
मत्स्यव्यवसाय : ९२४
उद्योग, ऊर्जा, कामगार : २७९
अन्न, नागरी पुरवठा
ग्राहक संरक्षण : ६२
पाणीपुरवठा व स्वच्छता : १६
सामान्य प्रशासन : ९५७
मराठी भाषा : २१
आदिवासी विभाग : ०७
मुंबई महापालिका : २१
पर्यावरण : ०३
गृह : ११५९
वित्त : ३५६