सौ मयुरी देशमुख-गिल्डा यांचा सीमनगाव येथे सत्कार

0 209

सेलू ( नारायण पाटील)
येथील प्रसिद्ध व्यावसायिक तथा माजी नगरसेवक प्रफुल्ल उर्फ बाळू सेठ गिल्डा व सौ.लता प्रफुल्ल गिल्डा यांच्या सूनबाई तथा मिरज येथे कार्यरत असलेले  उपविभागीय पोलिस अधिकारी मा.प्रणिलजी गिल्डा यांच्या  पत्नी सौ.मयुरी देशमुख -गिल्डा नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पात्र झाल्या आहेत.त्यानिमित्त माजी जिल्हा परिषद सभापती तथा बळीराजा संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक नाना काकडे यांनी त्यांचं त्यांच्या मूळ गावी सिमनगाव येथे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी प्रफुल्ल गिल्डा,सौ.लता गिल्डा, गोविंद कासट, मंजुषा बोराडे, नंदुसेठ बहीवाल,सौ.बहीवाल, बंडू नाना कदम, रमेशराव डख, अशोक उफाडे, योगेश कुलकर्णी सचिन रत्नपारखी,बाबासाहेब राखे आदीची उपस्थिती होती .

error: Content is protected !!