जिल्हा परिषदेत राष्ट्रीय पंचायत राज दिवस साजरा

6 10

परभणी,दि 24 ः
गुरुवार दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या सभागृहात राष्ट्रीय पंचायत राज दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) ओमप्रकाश यादव, मुख्य लेख व वित्त अधिकारी सचिन कवठे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राहुल गीते, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.नामदेव आघाव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) रेखा काळम, समाज कल्याण अधिकारी सरस्वती भोजने यांच्यासह जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

राष्ट्रीय पंचायत राज दिवसाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार येथून थेट प्रक्षेपणातून नागरिकांशी संवाद साधला. जिल्हा परिषदेतील कार्यक्रमाचे नियोजन पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संदीप घोन्सीकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागातील सहाय्यक गट विकास अधिकारी एल डी नीलपत्रेवार, विस्तार अधिकारी राजाराम सूर्यवंशी यांच्यासह आदी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!