न्यू हायस्कुल शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात साजरा विविध क्रीडा स्पर्धा, आनंद नगरी

0 42

 

सेलू,दि 10 (प्रतिनिधी)
येथील न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेह संमेलना निमित्त कबड्डी, खोखो, धावणे, स्लोसायकल, लिंबू चमचा अशा विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. तर विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका याचा अनुभव मिळावा या उद्देशाने आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी इडली, वडापाव, समोसा, चने, भेळ, चिवडा, पापड, ब्रेडपकोडा, मुगवडा अशा विविध पदार्थांचे तर बोर, टहाळ, बोरकूट अशा शेती संबधीत पण गोष्टी विक्री साठी ठेवल्या होत्या.विद्यार्थ्यांनी एकूण 26 स्टॉल लावले होते. सर्व स्टॉलवरील पदार्थ एका तासात विद्यार्थ्यांनी फस्त केल्या. विद्यार्थ्यांना विविध पदार्थांचा आस्वाद घेता आला तर स्टॉलधारक विद्यार्थ्यांना विक्रीतून व्यवसायाचा अनूभव मिळाला. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उदघाटनाच्या कार्यक्रमास शालेय समिती अध्यक्ष अशोक काकडे, संतोष कुलकर्णी सर, ॲड अशोकराव फोफसे, ॲड गोविंद शेळके, हभप चव्हाण महाराज, मुख्याध्यापक बी ए नाईकनवरे, पर्यवेक्षक धनंजय भागवत, सांस्कृतिक विभाग प्रमुख रामेश्वर गाडेकर, शेषराव नागरे दिनकर नखाते आदिंची प्रमुख उपस्थिती होती. देवी सरस्वती व कै विनायकराव पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरूवात झाली. सांस्कृतिक कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी किर्तन, लोकगीत, भावगीत यासोबतच श्री गणराया, मी हाय कोळी, येडाई माझी दिसणार आज, असं वाजवा की, आम्ही शिवकन्या, चल छय्या छय्या, चला जेजुरीला जाऊ, आवाज वाढव डीजे तुला, नसानसात आमच्या जोर, कोंबडी पळाली, काठी न घोंगड घेऊ द्या की र ,दया दया दयारे, मदन मंजिरी, जहा पाव मे पायल, माझ्या डोळ्यात काजल रह गया रे, काशी की ताई चांदी सिका, अंगारो पे अबरसा लगता है मेरा सामी, माय मराठी गळ्यात घालीन गाणं, अप्सरा आली, तुझे देखते ही मेरा मन, वरील अनेक गाण्याचे सादरीकरण झाले.याप्रसंगी शेलापागोटे कार्यक्रमाचाही आनंद विद्यार्थ्यांनी घेतला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी ए नाईकनवरे यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जी के तोटेवाड यांनी तर आभार रामेश्वरम गाडेकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शरद मगर, सुनील मोरे,प्रनयना तेलगोटे, मंजुशा बोराडे, बुरकुले मॅडम, एस डी कुलकर्णी, बी बी निकम, रोंटेवाड एस आर, बाबासाहेब आव्हाड, एम एस बेग, विष्णू गजमल, नारायण काष्टे, अंगद मोरे आदिंनी सहकार्य केले. कार्यक्रमास प्रतिष्ठित नागरीक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!