निफाड तालुका सहकारी ग्रामोद्योग संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

मनाचा मोठेपणा दाखवत बिनविरोध निवडीसाठी सर्वांचे प्रयत्न

0 157

 

 

निफाड, रामभाऊ आवारे – निफाड तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीचं बिनविरोध पार पडली. सन २०२१ ते २०२६ या पंचवार्षिक करिता संचालक मंडळात बिनविरोध म्हणून सर्वसाधारण गटातून भागवतबाबा बोरस्ते (साकोरे), दिलीप मंडलिक (ओझर), जयराम वाघ (सुकेना), संदीप शिरसाट (विंचूर), तैय्यब शेख (उगाव), हसन शेख (निफाड), महिला राखीव प्रतिनिधी गटातून सुनंदा आहेर (निफाड), राधिका गायकवाड (निफाड) तर अनुसूचित जाती जमाती गटातून केदारनाथ आहिरे (नांदुर्डी) तसेच विमुक्त जाती जमाती गटातून भाऊसाहेब फटांगडे (वडाळी नजीक) आणि इतर मागासवर्गीय गटातून शंकरराव वाघ (निफाड) हे बिनविरोध निवडून आले आहेत.

निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार पंढरीनाथ पीठे, संजय सुरळीकर, तन्वीर राजे, नईमखा पठाण, संतोष गायकवाड, जनार्दन कराड, सोमनाथ लोंढे, शरद लोहकरे, ऍड. लक्ष्मण वाघ, स्वाती बिडवे, संगीता कदम व इतरांनी मनाचा मोठेपणा दाखवत वेळेत माघार घेतली म्हणून ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकरी म्हणून आर. एस. ढवळे साहेब तर सहायक निवडणूक निर्णय अधिकरी म्हणून ग्रामोद्योग संघाचे सचिव प्रशांत आहेर यांनी घोषित केले. ही संपूर्ण निवडणूक बिनविरोष व्हावी म्हणून राष्ट्रवादी व्ही.जे.एन.टी. सेलचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव ढेपले, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस शंकरराव वाघ, तालुका काँग्रेस अध्यक्ष मधुकर शेलार, संकल्प सेवाभावी संस्थाध्यक्ष संजय आहेर, तन्वीर राजे, सुहास सुरळीकर, केदारनाथ आहिरे, इत्यादींनी विशेष प्रयत्न केले.

बिनविरोध निवडून आलेल्या संचालक मंडळातील सर्व सदस्यांचे आमदार दिलीपकाका बनकर, शिवाजीराजे ढेपले, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार, अर्बन बँक चेअरमन राजाभाऊ राठी, लक्ष्मी नागरी पातसंस्था संस्थापक नंदलाल चोरडीया, नगरसेवक अनिल पा. कुंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मधुकर शेलार, जयश्री बॅंकेचे मा चेअरमन छोटूकाका पानगव्हाणे, कृषीभूषण कैलास खापरे, रासाका कृती समितीचे नामदेवराव शिंदे, केंद्रीय पत्रकार संघाचे संघटक रामभाऊ आवारे, वंजारी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाबुराव सानप, रासाका बचाव कृती समिती विश्वस्त हरीश झालटे, सोसायटी चेअरमन रमेशभाऊ जाधव, माणकेश्वर वाचनालयाचे संचालक सुनील चिखले, कवी राजेंद्र सोमवंशी, बाळासाहेब कापसे सर, खंडूकाका कडलग, शरदराव ढेपले, अनिल भोर, नाथाभाऊ खरात, राहुल नागरे, सुनील सानप, यांचेसह संस्थेचे सर्व सभासद , इतर नागरिक, वगैरेंनी नवनिर्वाचित संचालक मंडळाचे विशेष अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!