प्रत्येक गावात लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले पाहिजे- सभापती सौ सुवर्णाताई जगताप
रामभाऊ आवारे
निफाड,दि 03 ः
कोरोनाचा वाढता संसर्ग व डेंगू चिकनगुनिया सारखे महा भयंकर साथीचे आजार तसेच व्हायरल इन्फेक्शन रोखण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे लसीकरण आहे. आपले ,आपल्या कुटुंबाचे ,आपल्या भोवतालचे ,आपल्या गावाचे ,आपल्या गावाशेजारील पंचक्रोशी, तालुका ,जिल्हा यांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी साथी रोगाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक गावात लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले पाहिजे असे आरोग्य विषयक विचार लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सौ सुवर्णाताई जगताप यांनी व्यक्त केले आहे.
दैनिक शब्दराजचे निफाड तालुका प्रतिनिधी रामभाऊ आवारे ( वनसगाव) यांच्याशी संवाद साधताना त्यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हटले की, फेब्रुवारी- मार्च २०२१ या सुरुवातीच्या काळात प्रतिबंधक लसींचा साठा उपलब्ध असतानांही नागरिक अनामिक भीतीने लसीकरणास पुढे येत नव्हते .परंतु नागरिकांच्या आरोग्य प्रश्नाचा विचार करता लोकसंख्येच्या तुलनेने पाहिजे त्या प्रमाणात लसीकरण झालेली नसल्याने ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज असुन सद्यस्थितीत शहरी भागासह ग्रामीण भागातही चिकनगुनिया व डेंगूचा फैलाव वाढत चालला असून तो आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाने पावले उचलण्याची गरज आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने कुटुंबाची तपासणी करणे तितकेच महत्त्वाचे बनत चालले आहे. त्याच प्रमाणे ज्या कुटुंबामध्ये आरोग्याचा प्रश्न अधिक तीव्रतेने भेडसावत आहे त्या कुटुंबातील सदस्यांनी ग्रामपंचायतीशी संपर्क साधून त्वरित इलाज करणे महत्त्वाचे आहे. वृद्ध ,अपंग,निराधार नागरिकांना ग्रामपंचायतींच्या मार्फत मोफत औषध उपचार करण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे
आरोग्य विभागाने लस उपलब्ध करून प्रत्येक गावातील नागरिकांना लस मिळावी ही सामाजिक बांधिलकी जपणे ग्रामपंचायत प्रशासनासह आपली ही नैतिक जबाबदारी ओळखून पुढाकार घेणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींनी
केवळ आपल्या कुटुंबाचा, आपल्या हितचिंतकांचा व आपल्या जवळील नातेवाईक, मतदार यांचाच लसीकरणासाठी विचार न करता आपल्या गावासाठी आपल्या परिसरासाठी जास्तीत जास्त लस कशी उपलब्ध करून देता येईल ? याचा विचार केला तर निश्चितच वैश्विक महामारी तून आपण सहिसलामत बाहेर पडण्यासाठी मदत होईल. सद्यस्थितीत बऱ्यापैकी लस उपलब्ध होत असली तरीही गाफील न राहता सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. कोरोणाचा सामना करण्यासाठी एकमेव उपाय लसीकरण असल्याने प्रत्येक गावातील नागरिकांच्या आरोग्याच्या हिताचा विचार करता जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध करून द्यावी व लाभधारकांनी लसीकरण मोहीमेत सहभागी होतांना घाबरून न जाता सुरक्षित अंतराचे पालन करून गर्दी न करता लसीकरण करून घ्यावे व आरोग्य प्रशासन, पोलिस प्रशासन, ग्रामपंचायत व विविध सामाजिक उपक्रम राबविण्या-या सेवाभावी संस्थाना सहकार्य केले पाहिजे. सद्यस्थितीत दुसरे डोस घेणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने नव्वद ते शंभर दिवस पूर्ण झालेले बहुतांश लाभधारक असल्याने वरील बाबींचा विचार करता लवकरात लवकर लस टोचून घ्यावी व डेंगू मलेरिया व्हायरल इन्फेक्शन सारख्या महा घातक आजारापासून आपल्या आरोग्याची काळजी घेऊन प्रतिबंध करून घेतला पाहिजे.
प्रत्येक कुटुंबाने आपला परिसर स्वच्छ ठेवून आरोग्याची काळजी घ्यावी–
सद्यस्थितीत कोरोनाच्या दुसऱ्याला लाटेनंतर तिसऱ्या लाटेने महा भयंकर रूप धारण केले असून त्यातच डेंगू, चिकनगुनिया सारखे साथीचे आजार बळावत असल्याने प्रत्येक कुटुंबाने आपला परिसर स्वच्छ ठेवून आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. त्याच बरोबर दररोज पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चांगली केली पाहिजे.दररोज वापराचे पाणी बदलले पाहिजे. घराजवळील परिसर स्वच्छ केला पाहिजे.बाजारु मिठाई,शिळे अन्नपदार्थ खाणे टाळावे,आजाराची लक्षणे दिसल्यास वेळीच आपल्या फॅमिली डॉक्टर कडून सल्ला घेऊन त्यावर इलाज केला पाहिजे.
सौ.मनिषा भारत जगताप – मा उपसरपंच पाचोरे बु.