संघटन टिकले तरच पक्ष टिकेल,सेलु तालुक्यात विविध गावात शिवसंपर्क अभियान

0 117

सेलू ,दि 25 (प्रतिनिधी)ः
सर्व शिवसैनिकांनी एक संघ होऊन संघटन वाढवणे गरजेचे आहे .कारण संघटन टिकले तरच पक्ष टिकेल असे आवाहन शिवसेना संपर्क अभियानात मार्गदर्शन करतांना मुबंई येथून आलेल्या नेत्यांनी केले .
सेलु तालुक्यातील ढेंगळी पिंपळगाव व हीस्सी या गावी शिवसंपर्क अभियान कार्यक्रमात दि २५ रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी बोलताना कुणाल काळे यांनी स्पष्ट केले की ग्रामीण भागातील व शिवसैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व पक्ष वाढीसाठी काय करता येईल यासाठी शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री मा .उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार प्रत्येक तालुक्यात हे शिवसंपर्क अभियान राबवले जात आहे .व या बैठकीतील सर्व लेखा जोखा आम्ही साहेबांना सादर करणार आहोत .व अंतिम निर्णय ते घेणार आहेत .यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केले आणि गावातील नागरिकांच्या समस्या जाणुन घेतल्या .
या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणुन मुंबईहुन आलेले प्रमुख मा. कुणाल काळे साहेब, मा. विशाल सावंत साहेब, मा. हेमंत रासम साहेब, मा. दिपक राजपुत साहेब, सेलु जिंतुर विधानसभा प्रमुख तथा जि. प. गटनेते मा. श्री राम पाटील, उपजिल्हाप्रमुख तथा मार्केट कमिटीचे सभापति रंजित गजमल, ता. प्रमुख रमेश डख, युवासेना उपजिल्हाप्रमुख पवन घुमरे, बाजार समितीचे प्रशासक सुधाकर पवार, विठ्ठलराव महाराज कारके,जिवन चव्हाण, युवासेना ता. प्रमुख अतुल डख, युवासेना शहरप्रमुख वैभव वैद्य, गुलाब खेडेकर,अनिल रोडगे, कृष्णा तिडके, ओंकार पवार, शक्ती बोराडे, माऊली सोळंके, विष्णु नाईकनवरे, बाळासाहेब ढेंगळे,दिपक मगर, कैलास वैरागड, निरज पवार, व शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी ,लोकप्रतिनिधी व गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

error: Content is protected !!