पूर्णा येथे ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी २१ व्या बुद्धधम्म परिषदेचे आयोजन
पूर्णा,दि 29 ः
बुद्ध विहार पूर्णा येथे दि.३१ जानेवारी व १ फेब्रुवारी २०२४ रोजी २१ वी बुद्ध धम्म परिषद व स्मृतिशेष भदंत उपाली थेरो यांच्या ४१ वा स्मृतिदिनाचे आयोजन भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो,( कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन भंते पय्यावंश, बुद्ध विहार समिती पूर्णा , भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पूर्णा व विविध महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी दोन दिवसीय बुद्ध धम्म परिषद व देश विदेशातील भिक्खू संघाची धम्मदेसना होणार असून या निमित्त शहरात बुद्ध डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाची भिक्खू संघासह भव्य धम्म मिरवणूक काढण्यात येणार आहे.
या धम्म परिषदेचे उदघाटन दुपारी ३ वाजता कोरियन बुद्धिष्ट विद्यापीठाचे व्हॉईस चांसलर भिक्खू डॉ.ली ची रॅन यांच्या हस्ते होणार आहे. परिषदेच्या अध्यक्षस्थानी भिक्खू करूणानंद महाथेरो (दिल्ली) संघनायक अखिल भारतीय भिक्खू संघ बुद्धगया, प्रमुख अतिथी म्हणून ना.संजय बनसोडे, (मंत्री क्रीडा , युवक कल्याण व बंदरे महाराष्ट्र राज्य मुंबई , तथा पालक मंत्री जिल्हा परभणी ),लुंबिनी स्मरणिकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे (भा.प्र.से .) परभणी यांची उपस्थिती राहणार आहे.
धम्म परिषदेला प्रमुख उपस्थिती म्हणून
भदंत धम्मानंद थेरो, छ.संभाजी नगर, भदंत सुभूती थेरो , भदंत शिलरत्न थेरो (नांदेड), भंते नागसेन बोधी उदगीर , भदंत संघपाल थेरो वाजेगाव , भदंत बोधिधम्मा थेरो धम्माचल अजिंठा लेणी , भदंत धम्मसार किल्लारी , भदंत सुमेध नागसेन खरोसा, भदंत रेवतबोधी देगलुर , भंते संघरत्न (देवगाव फाटा)
इत्यादी भिक्खु संघाची उपस्थिती राहणार आहे. खासदार संजय (बंडू) जाध व, धम्मा मास्टर डॉ. हाँग जीन सू (दक्षिण कोरिया) , राजकुमार आनंद मा. सदस्य एससी/ एसटी कमिशनर उत्तर प्रदेश , आ. डॉ
रत्नाकर गुट्टे, आ.डॉ.राहुल पाटील, राजकुमार बडोले मा.सामाजिक न्यायमंत्री , आ. बाबाजानी दुर्राणी , आ.मेघना साकोरे
( बोर्डीकर), डॉ.एस. पी. गायकवाड ,चेअरमन पीईएस सोसायटी मुंबई, सिनेअभिनेता गगन मलिक, डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे (अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनु.जाती विभाग), गित्ता गुठ्ठे (सहायक समाज कल्याण आयुक्त परभणी), संजय पाटील कार्यकारी अभियंता सा.बा.विभाग परभणी आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
धम्मपरिषदेत प्रथम सत्रात, ” म ज्झिम
निकायातील बुद्धधम्म” या विषयावर भदंत धम्मसेवक महाथेरो ,(अध्यक्ष अ.भा.भिक्खू संघ महाराष्ट्र प्रदेश) , भदंत शरणानंद महाथेरो (पाथरी), भदंत बोधीपालो महाथेरो (चौका),
भदंत विशूद्धानंद महाथेरो ,(बुद्धगया), भदंत सुमनवन्नो महाथेरो ,(चंद्रपूर), भदंत डॉ.
यशकाश्यपायन महाथेरो (जयसिंगपूर)
द्वितीय सत्रात,” अंगुत्तर निकायातील बुद्धधम्म “या विषयावर भदंत प्रा.डॉ.एम
.सत्यपाल महाथेरो (छ.संभाजी थेरो नगर), भदंत डॉ. इंदवंश महाथेरो छ. संभाजी नगर, भदंत एस. प्रज्ञाबोधी (मावसाळा), भदंत ज्ञानरक्षित थेरो ,(छ.संभाजीनगर), भदंत धम्म ज्योती थेरो ( छ. संभाजी नगर), विररत्न थेरो , (मुंबई), भदंत धम्मबोधी थेरो (छ.संभाजी नगर) यांची धम्मदेसना होणार आहे.
दि. १ फेब्रुवारी रोजी प्रथम सत्रात दुपारी ,२ वाजता ” संयुक्त निकायतील बुद्ध तत्वज्ञान ”
या विषयावर भदंत प्रा.डॉ.खेमधम्मो महाथेरो
(उमरखेड), भदंत करुणानंद थेरो( छ.संभाजी नगर), भदंत पय्यातिस्स थेरो,
(सिरसाळा), भदंत पय्यारत्न थेरो ( विपश्यनाचार्य नांदेड), भदंत महाविरो थेरो (काळेगाव अहमदपूर ), द्वितीय सत्रात ,” दैवी चमत्कारावर आधारित धर्म हा अधम्म आहे.” या विषयावर भदंत धम्मधर थेरो (जालना), भदंत मुदितानंद थेरो ,(परभणी), भदंत रेवतथेरो मन्नाकेळी (कर्नाटक), भदंत पय्याबोधी (खुरगाव नांदेड), भदंत पय्यानंद थेरो (लातूर),भदंत धम्मशिल थेरो ,( बीड) , भदंत शिवली (जालना) यांची धम्मदेशना होणार आहे.
धम्म परिषदेच्या सुरुवातीस बुद्ध विहारात
त्रिशरण , पंचशील , सामूहिक बुद्ध वंदना पूजा विधी संपन्न होईल.डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पूर्णा येथे ३१ जानेवारी रोजी सकाळी ९: ३० वाजता धम्म ध्वजारोहण भिक्खू हाँग जीन सू साऊथ कोरिया यांच्या हस्ते होईल. १० वाजता भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते करण्यात येईल. दुपारी ,१२ – ३० वाजता डॉ.आंबेडकर नगर येथे रिपाइं नेते प्रकाश कांबळे यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात येईल. गुरुवारी १ फेब्रुवारी रोजी सकाळी १०- ३० वाजता प्राचार्य डॉ.मोहन मोरे यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात येईल. उपासक उत्तम मुगाजी खंदारे यांच्याकडून भिक्खू संघाला भोजन दान करण्यात येईल.
दरम्यान २३ जानेवारी २०२४ ते २ फेब्रुवारी पर्यंत अंशकालीन दहा दिवसीय श्रामनेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर १२५ व्या जयंती निम्मित सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने एक कोटी रु.निधी मधून उभारण्यात आलेल्या इमारतीचे लोकार्पण , अजिंठा कमानीचे उदघाटन व नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
या धम्म परिषद सत्कार कार्यक्रमास बहुसंख्येने नागरिक महिला – पुरुष, युवा वर्गाने उपस्थित राहण्याचे आवाहन, बोधिसत्व डॉ.बी .आर आंबेडकर स्मारक व बुद्धविहार समिती , भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पूर्णा, विविध महिला मंडळाच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.