श्री शिवाजी विधी महाविद्यालयात अतिथी व्याख्यानाचे आयोजन
परभणी / प्रतिनिधी – श्री शिवाजी विधी महाविद्यालय येथे सोमवार २४ फेब्रुवारी रोजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायदा २०२३ अंतर्गत कायदे आणि जामीन या विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानास साधन व्यक्ती म्हणून ऍड.शेख ज़ाहेद, परभणी जिल्हा व सत्र न्यायालय, परभणी यांची उपस्थिती होती.
यावेळी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय पी. माकणीकर हे तर प्रमुख उपस्थिती म्हणून ऍड.जबीउर्रहेमान, सचिव, बार असोसिएशन परभणी. यांची उपस्थिती होती. कार्यक्रम समन्वयक म्हणून महाविद्यालयाचे प्रा.डॉ.वसीम आय खान, प्रा.डॉ. ग्यानेंद्र फुलझळके, प्रा.डॉ.हर्षा सूर्यवंशी आदींनी भूमिका पार पाडली. सूत्रसंचालन एलएल.बी. तृतीय वर्षाची विद्यार्थिनी शिवानी शिंदे तर आभार प्रदर्शन राधिका सूर्यवंशी यांनी केले. या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना करिता महाविद्यालय विकास समितीचे सन्माननीय सदस्य मा. श्री चंद्रशेखर नखाते, मा. श्री. गोविंद कदम, मा. श्री मकदुम मोहिउद्दिन, मा. श्री. संतोष बोबडे, मा. ॲड. दिपक देशमुख, मा. ॲड. अशोक शिंदे व मा. श्री. संतोष इंगळे आदींनी अभिनंदन केले.