महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्यावतीने महाग्रामीण नवचेतना संवाद यात्रेचे आयोजन
पुर्णा ,दि 08 (सुशील कुमार दळवी):शेतकऱ्यांना पिक कर्ज नुतनीकरण, व्याज परतावा तसेच शासनाच्या प्रोत्साहनपर योजनेचे महत्व पटवून सांगण्यासाठी व त्यांच्या सोबत संवाद साधण्यासाठी महाग्रामीण नवचेतना संवाद यात्रेचे दि.५ जून ते १५ जून दरम्यान आयोजन करण्यात आले आहे संपूर्ण मराठवाड्यात तब्बल ५० ठिकाणी हि यात्रा कार्यक्रम घेऊन संवाद साधण्यात येणार असून या दरम्यान तब्बल २००० नियमित पिक कर्ज धारकांचा सत्कार तसेच संपूर्ण यात्रेदरम्यान २०००
झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे सदरील यात्रेस दि ५ जून रोजी छ. संभाजीनगर येथून सुरुवात झाली आसुन दोन वेगवेगळ्या मार्गांनी नांदेड या ठिकाणी एकत्र येणार आहे १५ तारखेला नांदेड ला या संवाद यात्रेचा समारोप होणार आहे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड या मार्गाने मार्गक्रमण करणार असून या दरम्यान कळमनुरी तालुक्यातील वारंगा मसाई येथे दि.११जुन राजी महादेव मंदिर मुरुडेश्वर देवस्थान पिंपळगाव तालुका पालम येथे हि संवाद यात्रा नागरीकांसोबत संवाद साधणार आहे यावेळी एटीएम मशीन चे प्रात्यक्षिक तसेच आर्थिक समावेशन, डीजीटल साक्षरता आणि सामाजिक सुरक्षा योजनांबद्दल जनजागृती करण्यात करण्यात येणार आहे. बँकेचे सर्व सन्माननीय ग्राहक, गावातील प्रतिष्ठित नागरिक, बचत गटातील महिलावर्ग तसेच संबंधित शासकिय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी या सर्वांनी आपापल्या गावात येणाऱ्या महाग्रामीण नवचेतना संवाद यात्रेत मोठ्या संख्येने सामील होण्याचे व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन पूर्णा महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखा अधिकारी यांच्या वतीने करण्यात येत आहे.