श्री शिवाजी महाविद्यालयात गणित प्रश्नमंजुषा-मॉडेल स्पर्धेचे आयोजन

0 2

परभणी,दि २६ (प्रतिनिधी)ः
येथील श्री शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिवसाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी गणित प्रश्नमंजुषा तसेच गणित मॉडेल बनविण्याच्या स्पर्धेचे आयोजन शनिवार (दि.२८) रोजी करण्यात आले आहे.
सदरील स्पर्धा भारत सरकारच्या नॅशनल कॉन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा गणित विभाग तसेच श्री शिवाजी महाविद्यालयाच्या गणित विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय विद्यार्थ्यांसाठी शनिवार (दि.२८) रोजी महाविद्यालयात संपन्न होणार आहे.
प्रश्नमंजुषा स्पर्धेत एका शाळेतून इयत्ता दहावीच्या चार विद्यार्थ्यांचा एक संघ सहभागी होऊ शकतो तर गणित मॉडेल बनविण्याच्या स्पर्धेत एका शाळेतून जास्तीत-जास्त पाच विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. प्रश्नमंजुषा स्पर्धेतील जिल्हा पातळीवर पहिल्या दोन विजेत्या संघास श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. तर गणित मॉडेल मेकिंग स्पर्धेतील विजेत्या संघास प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रश्नमंजुषा स्पर्धेतून दोन संघ तर मॅथ मॉडेल मेकिंग स्पर्धेतून ५ मॉडेल विद्यापीठात होणाऱ्या अंतिम फेरीसाठी निवडण्यात येणार आहेत. सदरील स्पर्धेसाठी अधिकाधिक शालेय संघांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्य डॉ.रोहिदास नितोंडे, स्पर्धा समन्वयक तथा विभागप्रमुख प्रा.शरद कदम, डॉ.चारुदत्त बेले यांनी केले आहे.

 

प्रति,

error: Content is protected !!