सेलूत परशुराम जन्मोत्सवाचे आयोजन; भव्य शोभायात्रेचे नियोजन
सेलू / नारायण पाटील – २९ एप्रिल २०२५ रोजी परशुराम जयंती चे औचित्य साधून परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने यावर्षी देखील जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्याचे आयोजन करण्यात आले आहे .या जन्मोत्सवाच्या आयोजनासाठी एका बैठकीचे आयोजन ग्रामदैवत केशवराज बाबासाहेब महाराज मंदिर मध्ये करण्यात आले होते .
यावेळी प्रल्हादराव कान्हेकर ,संतोष पाटील ,मनोज दीक्षित व यशवंत चारठानकर यांच्या हस्ते भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .यावेळी शहरातील ब्रम्हवंद व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .
यावेळी जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात यावा व भव्य शोभायात्रा काढण्याचे सर्वानुमते ठरले .यावेळी विविध उपक्रमाबाबत देखील सविस्तरपणे चर्चा करण्यात आली .
परशुराम जयंतीनिमित्त सकाळी ८ वाजता सर्व ब्रम्हवंदा कडून परभणी रोडवरील भगवान परशुराम मूर्तीस अभिषेक करण्यात येणार आहे
.
दुपारी ५ वाजता केशवराज बाबासाहेब मंदिर पासून शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे .
यावेळी बँड पथक ,संबळ पथक ,कलशधारी महिला ,महिलांचे टाळपथक ,परशुरामाची भव्य मूर्ती ,परशुरामाची आई रेणुकामातेचा भव्य तांदळा ,पालखी ,लेझीम पथक तसेच तोफा व फटाक्यांची आतिषबाजी केली जाणार आहे .
सुभेदार गल्ली ,फुलारी गल्ली ,मारवाडी गल्ली ,महाजन गल्ली ,सारंगी मारोती मंदिर ,गोविंदबाबा चौक ,क्रांती चौक मार्गे ही शोभायात्रा केशवराज बाबासाहेब मंदिर मध्ये येणार आहे .तिथे परशुरामाची सामूहिक आरती होऊन प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे .
तसेच परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात येणार आहे .
तरी या परशुराम जन्मोत्सव सोहळ्यासाठी समाजबांधवांनी तन ,मन व धनाने सहकार्य करून सर्व कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन देखील जन्मोस्तव समितीच्या वतीने करण्यात आले आहे .
या बैठकीचे सुत्रसंचालन प्रा अमित कुलकर्णी यांनी केले .सामूहिक पसासयदानाने कार्यक्रमाची सांगता झाली