सुशिक्षित बेरोजगारांसाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजन
परभणी – जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी महाराष्ट्र शासनाच्या 7 कलमी कृती कार्यक्रम अंतर्गत 100 दिवसाच्या कृती आराखड्यानुसार जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्यो जकता मार्गदर्शन केंद्र, परभणी, श्री शिवाजी महाविद्यालय परभणी, श्री शिवाजी इन्स्टीटयुट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड मॅनेजमेंट स्टडीज व श्री शिवाजी पॉलिटेक्निक इन्स्टीटयुट, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 01 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 08:30 वाजता सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांसाठी श्री शिवाजी महाविद्यालय कॅम्पस, वसमत रोड, परभणी येथे “पंडित दिनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा आयोजीत केला आहे.
रोजगार मेळाव्याचे उद्घा टन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते होणार आहे. तसेच प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे हे उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाकडून जिल्हयातील गरजू सुशिक्षित बेरोजगारांना खाजगी क्षेत्रात नोकरीची संधी उपलब्ध व्हावी या हेतूने हा भव्य महारोजगार मेळावा आयोजित केलेला आहे. मेळाव्यास राज्यातील विविध नामांकित मोठे उद्यो जक, कंपन्या सहभाग नोंदविणार आहेत.
जिल्ह्यातील बारावी, आयटीआय, डीप्लोमा, पदवी, बी.ई. पॉलिटेक्नीक इत्यादी शैक्षणीक पात्रता धारक उमेदवारांसाठी अप्रेंटिशिप, ट्रेनी, सर्वेअर, रिलेशनशिप मॅनेजर, विमा सल्लागार, इनव्हेसमेंट बैंकर बीमा सखी, सेल्स ऑफिसर, केमीस्ट, इनव्हेस्टर इक्झेकेटिव्ह, प्रोडक्शन वर्कर, हाऊस किर्पोग, वेल्डर, प्लंबर, मेसन, इलेक्ट्रीकल इत्यादी पदांसाठी मुलाखती घेवून जागेवरच निवड करण्यात येणार आहे. या पदांसाठी किमान वेतन 12 हजार ते 24 हजार असणार आहे.
महारोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी जिल्हयातील सुशिक्षित उमेदवारांनी नाव नोंदणी महाराष्ट्र शासनाच्या (mahaswayam.gov.in) या वेबसाईटवर करावी. नाव नोंदणीची सुविधा महारोजगार मेळाव्याच्या ठिकाणी देखील करण्यात आलेली आहे.
महारोजगार मेळाव्यात प्रत्यक्ष नावनोंदणी करणेसाठी दि. 01 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 08:00 वाजता आपल्या शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसहित श्री शिवाजी महाविद्यालय कॅम्पस, वसमत रोड परभणी येथे स्वखर्चाने सर्व उमेदवारांनी उपस्थित राहावे.
तरी जिल्हयातील जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी सदर मेळाव्यास सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्री प्र.सो. खंदारे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्यो जकता, परभणी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत कार्यालयाचे दुरध्वनी क्र. 02452-220074 संपर्क साधावा.