मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची आमची जुनीच मागणी-पुरुषोत्तम खेडेकर

0 74

परभणी,दि 18 ः
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची आमची जुनीच मागणी आहे. राज्य मागासवर्ग आयोगाला राज्य सरकारने काही सुचित केले आणि आयोगाने दिलेला अहवाल स्विकारला तर हा प्रश्न सुटू शकतो. सरकार म्हणते ओबीसीतून आरक्षण देणार नाही हा आडमार्गाने आरक्षण नाकारण्याचाच प्रकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने केवळ वेळ मारून नेण्यासाठी आरक्षण दिले तरी ते असंविधानिक असेल, असेही श्री.खेडेकर यांनी सांगितले.

मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम खेडेकर यांनी गुरुवारी (दि.18) परभणी येथे पत्रकार परिषदेत केली.यावेळी प्रा.अर्जुन तनपुरे, प्रा.पंजाब चव्हाण, जिल्हाध्यक्ष विठ्ठल भुसारे, सुभाष जाधव आदी उपस्थित होते.पुढे बोलताना श्री.खेडेकर म्हणाले,

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटासोबत झालेल्या युतीनुसार लोकसभेच्या हिंगोली व बुलढाणा या दोन जागा संभाजी ब्रिगेड पक्षाला मिळाव्यात अशी मागणी केलेली असून त्यावर अंतिम निर्णय झालेला नसला तरी विचार होवू शकतो, अशी माहिती
याप्रसंगी. श्री.खेडेकर यांनी सांगितले, बहुजन समाजातील परिवर्तनवादी चळवळी अत्यंत शिथिल झाल्या असून, या परिवर्तनाच्या वर्षात या संपूर्ण चळवळीमध्ये परिवर्तनाची ताकद निर्माण करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यासाठी नवीन ऊर्जा निर्माण करण्याची ताकद सर्वच परिवर्तनवादी चळवळीमध्ये यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्या दृष्टीने 16 ते 30 जानेवारी दरम्यान मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, संभाजीनगर तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
धर्म-जाती-प्रांताच्या नावाने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती तर बंदच झाल्यात जमा आहेत. नोकरभरती नाहीच, ज्या काही जागा रिक्त आहेत त्या कंत्राटी पध्दतीने भरल्या जात आहेत. चांगल्या आरोग्य संस्थांचे कंत्राटीकरण, खाजगीकरण होत असून या प्रकारांमुळे जनमाणसात भितीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. देशातील धार्मिक वातावरणामुळेही परिस्थिती अस्वस्थ होत आहे. एकप्रकारची राजकीय अस्थिरता आलेली असून शासन-प्रशासन-न्यायव्यवस्था डळमळीत झाली आहे. या अंगाने चळवळीचा प्रभाव न राहिल्याने समाजात अस्थिरता निर्माण झालेली आहे. त्यामुळे पुन्हा या लोकांना एकत्र आणून केवळ प्रतिक्रिया न देता कृतिशील कार्यक्रम हाती घेवून पर्यायी राजसत्ता निर्माण करण्यासाठी संभाजी ब्रिगेड या राजकीय पक्षाला बळ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विस्कटलेली घडी पुन्हा बसविण्यासाठी 16 जानेवारीपासून मराठवाड्यातील चार जिल्ह्यांचा दौरा सुरू असून 30 जानेवारीपर्यंत विदर्भात फिरणार असल्याचे श्री.खेडेकर यांनी सांगितले.
शेतकरी, शेतमाल आणि प्रामुख्याने शेतकरी आत्महत्या हे प्रश्न महत्वाचे आहेत. दररोज 12 ते 15 शेतकरी आत्महत्या करीत आहेत, आत्महत्या कमी होत नाहीत आणि सरकार ज्या काही योजना आणतेय त्या त्यांच्या पदरात पडत नाहीत. यामुळे शेतमालावर प्रक्रिया उद्योग सुरू करणे गरजेचे असून यातून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तरूण पिढीला हे अर्थकारण समजावून देत अपरंपरागत पध्दतीने नवीन धोरणानुसार तयार करण्यात येईल.

error: Content is protected !!