साईबाबा नागरी सह बँकेस पद्मभूषण वसंतदादा पाटील उत्कृष्ट बँक पुरस्कार जाहीर
सेलू ( नारायण पाटील )
राज्यातील सहकार क्षेत्रात भरीव योगदान देत सहकार बळकट करणाऱ्या व सेलू शहरात आपली बँक म्हणून ओळख असलेल्या साईबाबा नागरी सहकारी बँकेस पद्मभूषण वसंतदादा पाटील उत्कृष्ट बँक पुरस्कार जाहीर झाला असून तसे पत्र बँकेस प्राप्त झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांनी दिली आहे .हे वृत कळताच संचालक श्री इम्रान अहेमद, आंधळे दतरावं, मुख्यकार्यकारी अधिकारी श्री रामराव लाडाने, सयद मुश्ताक रब्बानी, आदी नी स्वागत केले .
100कोटी ते 200कोटी च्या ठेवी या गटा तुन हा पुरस्कार देण्यात येणार असून छत्रपती संभाजीनगर विभागतून साईबाबा बँकेची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे .
दि महाराष्ट्र स्टेट कॉ ऑप बँक लि मुबंई यांच्या वतीने दिनांक 23/09/23रोजी नाशिक येथे मान्यवराच्या हस्ते या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. साईबाबा नागरी बँक ही सेलू, वालूर, परभणी, मानवत, जितूर बोरी या सहा शाखेतून काम करत आहे सस्थेने आपल्या सर्व शाखा सुसज्ज व संगनिकृत केल्या आहेत .तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या सोयी आपल्या ग्राहकांना देत आहे .उच्च विद्याविभूषित कर्मचारी वर्ग ग्राहकांना सेवा देण्यास सैदव तत्पर असतात.
हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष श्री हेमंत राव आडळकर यांनी सांगितले कि
सचालक मंडळ,सभासद, ग्राहक,अधिकारी यांच्या सहकार्याने व प्रयत्नानेच हा पुरस्कार मिळाला आहे.असे प्रतिपादन यावेळी बँकेचे अध्यक्ष हेमंतराव यांनी यावेळी केले .