Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/jvojvpkf/public_html/wp-includes/functions.php on line 6121
वेदना शमन: माणसाचा मुलभूत हक्क- डॉ. प्रिया राठी – शब्दराज

वेदना शमन: माणसाचा मुलभूत हक्क- डॉ. प्रिया राठी

0 76

माणसाच्या प्रत्येक शारिरीक वेदनेमागे काहीतरी हेतू असतो, कारण असतं. इजा पोचलेल्या पेशी मूळ परिस्थितीत आल्या की, वेदना दूर होते. अगदी रोजच्या कामांमधलेच उदाहरण घेऊयात. कधी गरम पातेल्याला हात लागला की हाताला वेदना होते म्हणून आपण हात चटकन मागे घेतो. उष्णतेमुळे पुढे हाताला होणारी इजा टाळण्यासाठी आपण हात मागे घेतो. पेशींना झालेली इजा बरी झाल्यानंतर ३ ते ६ महिन्यांनी वेदना जाणवत असेल तर तिला दीर्घकालीन वेदना असे म्हणतात. वेदना माणसाच्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टींमध्ये अडथळा निर्माण करते. त्यामुळे मानवी जीवनाचा दर्जा खालावतो, आपली कार्यक्षमता कमी होते. तसेच चालणे, झोपणे, उठणे- बसणे यासारखी रोजची कामे करताना त्रास व्हायला लागतो. या सगळ्याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावरही व्हायला लागतो. आपण तणावात राहायला लागतो. थकवा जाणवतो. आपल्या कुटुंबावरही नकळत आपल्या त्रासाचा परिणाम व्हायला लागतो. आपले काम, आर्थिक नियोजन, नातेवाईक यांच्याकडे आपले दुर्लक्ष होऊ लागते.

 

वेदना शमन आणि व्यवस्थापन हे अग्रगण्य आणि विस्तारणारे वैद्यकीय क्षेत्र आहे. यात रुग्णाच्या वेदनांचे निदान, त्यावर औषधोपचार, रुग्णाला वेदनांमधून बाहेर काढणे आणि त्याचे पुनर्वसन या बाबींचा समावेश होतो. वेदना शमनासाठी पहिले हॉस्पिटल अमेरिकेमध्ये १९७८ साली सुरु झाले. डॉ. जॉन बॉनिका हे त्याचे संस्थापक होय. जगभरात आता वेदना शमन हॉस्पिटल्सचा विस्तार झाला आहे.

 

वेदना शमन उपचारांची कोणाला गरज पडते?
डोकेदुखी
मान आणि पाठदुखी
संधिवात आणि इतर सांध्यांशी निगडीत दुखणी
स्नायूंची दुखणी
फायब्रोमायालजिया
शिरा दुखणे (वेगवेगळ्या कारणांमुळे शिरांमध्ये वेदना होणे)
शस्त्रक्रियेनंतरच्या वेदना
उदर आणि ओटीपोटाच्या वेदना
कर्करोगामुळे होणाऱ्या वेदना

 

 

खालील घटकांमुळे दीर्घकालीन वेदना उद्भवतात.
वाढते वय
हृदयरोग किंवा फुफ्फुसांचे विकार
स्त्री लिंग
धुम्रपान
मद्यपान
लठ्ठपणा
अपुरी झोप
डी जीवनसत्वाची कमतरता
अयोग्य पोषण (असंतुलित आहार)
अनुवांशिक घटक
उपचार पद्धती:
औषधे:
वेदना शामक गोळ्या
ओपिऑईड
न्युरोमोड्यूलेटर्स: शिरांना शांत करण्यासाठी यांचा वापर केला जातो.
नर्व्ह ब्लॉक्स (स्पाईन इंजेक्शन्स)

ट्रिगर पॉइंट इंजेक्शन: जागीच भूल देणारी ही इंजेक्शन्स असतात. ही स्टेरॉइड्स बरोबर किंवा त्याच्या शिवायही दिली जातात. वेदना कमी करणे, स्नायूंना शिथिल करणे हे त्यांचे काम असते.
रेडियोफ्रिक्वेन्सी लिजनिंग (रिझॉटॉमी): ही एक विना-शस्त्रक्रिया उपचार पद्धती आहे. ही उपचार पद्धती उष्णतेचा वापर करून शरीरातील वेदना कमी करते. दीर्घकालीन वेदनेच्या उपचारांसाठी या पद्धतीचा वापर होतो. यात संधिवात, मद=मणक्यांच्या स्नायूंचे इलाज, गुडघ्यांचा अस्थिसंधिवात, सॅक्रॉयलिटीस इत्यादींचा समावेश समावेश होतो.

 

 

अल्ट्रासाऊंड गाईडेड ड्राय नीडलिंग (यूएसजीडीएन): आधुनिक वेदनाशमन शास्त्रामध्ये ही उपचार पद्धती सर्वात परिणामकारक मानली जाते. शरीर शास्त्रानुसार सर्वात शेवटी वेदना स्नायुंपाशी येऊन थांबतात. संधिवात, शिरांचे दुखणे किंवा कोणताही आघात किंवा अपघात या सर्व प्रकारांमध्ये स्नायूंना सगळ्यात शेवटी वेदना जाणवते. या उपचार पद्धतीमध्ये घन, मोठ्या आणि टोकदार सुया ताठर किंवा घट्ट झालेल्या स्नायूंमध्ये टोचल्या जातात. सुया योग्य व अचूक ठिकाणी टोचल्या जाण्यासाठी अल्ट्रासाऊंडची मदत घेतली जाते. यामुळे स्नायूंना आराम मिळतो. ओघाने वेदना कमी होतात. सांध्यांची हालचाल सुरु होते. तसेच सांधे कार्यक्षम बनतात. यामुळे स्नायूंना आलेली सूज कमी होते. साधारण २० ते ३० मिनिटे सुया स्नायूंमध्ये ठेवल्या जातात. वेदनेचा कार्यकाळ लक्षात घेऊन किती वेळा ही उपचार पद्धती घ्यायची याचा अंदाज येतो. ही अतिशय सुरक्षित उपचार पद्धती आहे. तज्ज्ञांद्वारेच रुग्णाला दिली जाते. हे उपचार रुग्ण वारंवार घेऊ शकतो.
बोटॉक्स इंजेक्शन्स: सौंदर्य शास्त्रामध्येही बोटॉक्स इंजेक्शन्सचा वापर केला जातो. या इंजेक्शन्समध्ये स्नायूंना आराम देण्याचा गुणधर्म असतो. त्यामुळेच या क्षेत्रातही इंजेक्शन्सचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. स्ट्रोक नंतर होणाऱ्या वेदना, दीर्घकालीन वेदना किंवा
मज्जासंस्थेच्या विविध आजारांसाठी बोटॉक्स इंजेक्शन्सचा वापर केला जातो.

 

प्रत्यारोपित यंत्र: ही यंत्रे शरीरात बसवली जातात. यांचे प्रत्यारोपण अशा जागी केले जाते, जेणेकरून वेदनाशमन औषधे मणक्यापर्यंत पोचतील. दीर्घकालीन कर्करोग तसेच कर्करोगाशी निगडीत नसलेल्या विकारांसाथी याचा वापर होतो.
मणक्याला उत्तेजित करणे: वेदना शमन औषधशास्त्रामध्ये ही नुकतीच समोर आलेली उपचार पद्धती आहे. मणक्याजवळ इलेक्ट्रॉड्स बसवले जातात. तसेच पेसमेकर सारखे बॅटरीवर चालणारे एक यंत्र शरीरात बसवले जाते. वेदनेची संवेदना इतर कोणत्याही संवेदनेने बदलली जाते. उदा: मुंग्या येणे, झिणझिण्या येणे किंवा चिमटा बसणे इ. होय. जेव्हा इतर सर्व उपचार पद्धती अयशस्वी होतात, तेव्हा या उपचारांचा वापर केला जातो.

 

पुनर्वसन: दीर्घकालीन वेदना माणसाच्या दैनंदिन कामांत अडथळा निर्माण करतात. आयुष्याचा अनुभव घेताना रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांची अकार्यक्षमता वाढते. म्हणूनच रुग्णांना शक्य तितक्या लवकर मूळ स्थितीत आणल्यास त्यांचे स्नायू बळकट होतात. कार्यक्षमता वाढते. ओघाने ते रोजची कामे स्वतंत्रपणे करू शकतात.
मानसशास्त्रीय उपचार: एखाद्या महत्वाच्या परीक्षेसाठी आपण जसे मेंदूला तयार करतो त्याप्रमाणे वेदनांमधून जाण्यासाठी रुग्णांनी आपली मानसिक तयारी ठेवण्यासाठी ही उपचार पद्धती वापरतात.
थोडक्यात, कोणत्याही परिस्थितीत वेदनेला टाळू नये किंवा आपोआप बरी होण्याची वाट पाहू नये. आपल्या शरीरातून मिळणाऱ्या धोक्याच्या सूचनांना वेळीच ओळखा. डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्या. या गोष्टी वेळेत केल्यात भविष्यात होणारा त्रास वाचू शकतो.

error: Content is protected !!