परभणी महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी
परभणी,दि 30 ः
परभणी येथे जगत् गुरू एकोरामाराध्य आणि क्रांतीसुर्य, जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या 894 व्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षी प्रमाणे या ही वर्षी बुधवार दि. 30 एप्रिल रोजी शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळील मैदानात अभिवादन व ध्वजवंदन सोहळा संपन्न झाला.
सदरील अभिवादन व ध्वजवंदन कार्यक्रमाच्या सुरुवातीस ध्वजारोहण करून महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी परभणीचे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, तहसीलदार संदिप राजपुरे, तलाठी रवि काळे, शिवा संघटनेचे राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवणकर, माजी नगरसेवक सचिन देशमुख, शिवलिंग खापरे, प्रा. किरण सोनटक्के, अरुण पेडगावकर, डॉ. मारोती हुलसुरे, बंडू पाचलिंग, वसंतराव निलंगे, पंडितराव बरदाळे आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. तसेच याप्रसंगी जिल्हाध्यक्ष रामेश्वर कुबडे, शहराध्यक्ष कोंडीराम नावकीकर, कर्मचारी महासंघ जिल्हाध्यक्ष माधव सोनटक्के, गुलाब बिडकर, सोशल मीडिया जिल्हा प्रमुख जनार्दन खाकरे, मयूर पेटे, शिवा दामोदर आदी शिवा संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ही उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी शेवटे यांनी केले, तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
यावेळी महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त अभिवादन व ध्वजवंदन सोहळ्यास तमाम वीरशैव लिंगायत समाजबांधव आणि स्नेहजनांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तसेच शहरातील उघडा महादेव परिसरातील महात्मा बसवेश्वर चौक येथे ही अभिवादन सोहळा संपन्न झाला. येथे सुद्धा समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.