परभणी जिल्हा बंद रद्द,उपोषण स्थगित
परभणी,दि 13 ः
मराठा आरक्षणासाठी ८ जून पासून उपोषण सुरु केलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आज सहाव्या दिवशी त्यांचं उपोषण मागे घेतलं आहे. सगे-सोयऱ्यांच्या अंमलजावणीसाठी त्यांनी सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे एक महिन्यात सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर नाव घेऊन उमेदवार पाडू असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.उपोषण स्थगित केल्याने त्यामुळे दिनांक 14 जून रोजीचा परभणी जिल्हा बंद रद्द करण्यात आला आहे.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनास पाठींबा म्हणून परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती.परंतु आता उपोषण स्थगीत करण्यात आल्याने बंद रद्द करण्यात आला आहे.