परभणी जिल्हा पोलीस कर्मचारी सहकारी पतसंस्था अध्यक्षपदी लोकूलवार यांची हॅट्ट्रिक
सेलू (प्रतिनिधी )विकास पॅनल तर्फे लोकुलवार यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा परभणी जिल्हा पोलीस कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणुकीत वर्चस्व सिद्ध केलं आहे. या वर्षीच्या निवडणुकीत विकास पॅनल च्या माध्यमातून 13 पैकी 8 जागेवर विजय मिळला आहे.
विजयी उमेदवार पुढील प्रमाणे उपलेंचवार लक्ष्मण नाथराव ,कच्छवे बालाजी लिंबाजीराव ,केजगीर दिपक सुभाष ,गायकवाड शंकर प्रल्हादराव ,पांगरकर महेशकुमार पांडुरंग ,लोकुलवार माधव अर्जुनराव ,सिरसकर नरेश गोविंदराव ,क्षीरसागर गजानन देवीदास यांचा विजय झाला. सर्व विजयी उमेदवारांचे यावेळी स्वागत करण्यात आले . आपण आतापर्यंत कर्मचाऱ्यांची सेवा व सहकार्य यामुळे सर्वांचे प्रेम मिळाले व त्यातूनच हा विजय झाला .असे यावेळी बोलतांना माधव लोकूलवार यांनी स्पष्ट केले .भविष्यात देखील कर्मचाऱ्याच्या अडचणी प्रकरणी आपण प्राधान्याने सहकार्य करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले .