पूर्णा नगर पालीकेच्या गलथान कारभारामुळे जनता त्रस्त,पाण्यासाठी नागरिकांची भटकंती।
पूर्णा,दि 20 (प्रतिनिधी):- मोटार व पंप बिगाड झाल्याच्या नावाखाली शहरात गेल्या वीस दिवसापासून नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. नागरिकांची ही भटकंती पाहत सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे सलीम सौदागर यांनी स्वखर्चाने टँकर लावून प्रभाग क्रं ६ मध्ये पाणी वाटप करण्यास सुरू केले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहेत.
गेल्या तीन चार वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका न झाल्याने नगर परिषदांचे कारभार हे प्रशासक चालवत आहे. पूर्णा नगर परिषदेच्या या गलथान कारभारामुळे उन्हाळा सुरू होताच पूर्णेतील नागरिकांना दर वर्षी प्रमाणे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. कधी पाटबंधारे विभागाचे पैसे न भरल्याच्या कारणाने तर कधी मोटार व पंप बिगडल्याच्या कारणाने पंधरा ते वीस दिवस पूर्णेच्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची ही भटकंती पाहून सामाजिक कार्यकर्ते सलीम सौदागर यांनी स्वखर्चाने टॅंकर लावून प्रभाग क्रं ६ भीमनगर, खुरेशी मोहल्ला, कुंभार गल्ली आदी ठिकाणी पाणी वाटप करत आहेत. सलीम सौदागर व त्यांचे बंधू कलीम सौदागर यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.