पाथरी तालुक्यात विविध ठिकाणी वृक्ष लागवड; आत्माअंतर्गत परसबाग किट वाटप कार्यक्रम संपन्न
पाथरी, प्रतिनिधी : स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सवानिमित्त पाथरी तालुक्यातील मौजे वडी येथे फळबाग लागवड कार्यक्रम जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते संपन्न झाला. वडी येथील तेजस्विनी सदाशिव शिंदे, रजीउद्दीन अमीनुद्दीन शेख यांच्या शेतात ,माननीय जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आले.
तसेच कासापुरी येथील अनिल परमेश्वर कोल्हे कासापुरी व राणी दत्ता झुटे जवळा झुटा यांच्या शेतात जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री विजय लोखंडे , तहसीलदार सुमन मोरे , उपविभागीय कृषी अधिकारी श्री. हरणे , तालुका कृषी अधिकारी श्री नांदे , तसेच महसूल कृषी पंचायत समितीचे कर्मचारी- अधिकारी उपस्थित होते. तालुक्यात फळबागेचे क्षेत्र वाढण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत. असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी यावेळी केले.