राष्ट्रवादीच्या आमदाराला राहत्या घरातून पोलिसांनी केली अटक

0 221

शब्दराज ऑनलाईन,दि 03 ः
व्यापारी मित्रांना पोलिसांनी बेदम मारहाण केल्यामुळे भंडारा जिल्हाच्या तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर ५० लाख चोरीचा आरोप लावीत, मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा घातला होता. यानंतर आज राजू कारेमोरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. राहत्या घरातून त्यांनी अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर मोहाडी विधान सभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांचे दोन व्यापारी मित्र हे काल रात्री ९ वाजे दरम्यान आमदारांच्या घरून ५० लक्ष रुपयाची रोकड एका आरटीका गाडीतून तुमसर कडे जात होते. या दरम्यान मोहाडी येथील महिला आर्थिक विकास महामंळाच्या स्टँग रूमच्या बंदोबस्ता करिता पोलीस लागले होते.
यावेळी कार्यलयासमोर वळताना गाडी चालकांना इंडिकेटर का दिले नाही म्हणून दुचाकीवरील पोलीस आणि व्यापारीमध्ये वाद निर्माण झाला. वाद इतका विकोपास गेला की, गाडीत असलेल्या यासीम छावारे आणि अविनाश पटले या दोन व्यक्तींना पोलिसांनी बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच करेमोरे हे पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांच्या व्यापारी मित्र जवळील ५० लक्ष रुपयांची रोख रक्कम आणि एक सोन्याची चैन पोलिसांनी पळविले असल्याचा आरोप करीत धिंगाणा घातला.

फिर्यादी यासीम छवारे यांनी मोहाडी पोलिसात दिली आहे. तर बंदोबस्तावर तैनात असलेले पोलीस उप निरीक्षक राणे यांनी देखील फिर्यादी यांनी शासकीय कामात अडथळा करीत असल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांची तक्रार दाखल करून घेत तपास सुरु केला होता. त्यानंतर आज पोलिसांनी कारवाई करत राजू यांना अटक केली आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

error: Content is protected !!