दुधना नदीपात्रात वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले
लक्ष्मी माँल परीसरात घडली घटना; 4 लाख 6 हजाराचा मुद्देमाल जप्त, चालक फरार
सेलु, प्रतिनिधी – तालुक्यातील दुधना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर सेलू पोलिसांनी रविवार २ जानेवारी रोजी सकाळी ताब्यात घेतले. मात्र पोलीस पाहताच ट्रॅक्टर चालक वाहन सोडून पसार झाला. या प्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील काही दिवसापासून तालुक्यातील दुधना नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरु आहे. वाळूने भरलेली वाहने सर्रास शहराच्या मध्यवर्ती भागातून धावत आहे. मात्र महसूल विभागाकडून माळू माफियाविरुध्द कोणतेही कारवाई होताना दिसत नाही. रविवार २ जानेवारी रोजी सेलू पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार एका ट्रॅक्टरची तपासणी केली. तपासणीत दुधना नदीपात्रातून विना परवारना बेकायदेशीरित्या अवैध उत्खनन करुन चोरट्या विक्रीसाठी वाळू नेली जात होती. पोलिसाना पाहताच ट्रॅक्टरचालक पसार झाला. पोलिसांनी वाळूसह ट्रॅक्टर जप्त करुन ४ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस निरिक्षक रावसाहेब गाडेवाड यांच्या फिर्यादीवरुन आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक गाडेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली साह्यक पोलीस निरिक्षक सरला गाडेकर या करत आहेत.